पुणे : बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते.पण काहींना ही 'नुरी' लढत वाटत होती. बारामतीत मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सगळ्या अफवा आहेत. घाव करायचा तर तो मुळावरच अशा शब्दांत ही लढत मैत्रीपूर्ण नसल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीत स्पष्ट केले.बारामतीमध्ये युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर,आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल,बाबुराव पाचर्णे खासदार संजय काकडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.शाह म्हणाले, बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते.पण काहींना ही 'नुरी' लढत वाटत होती.पण असे काहीही नाही. या लढतीत कोणतीही तडजोड नसून बारामतीत भाजपाच येणार आहे.यातून महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, पवार, राहुल गांधी,मायावती, उमर आणि फारुख अब्दुल्ला हे एकत्र बसले. कारण त्यांना भारत आणि काश्मीर यांचे वेगवेगळे पंतप्रधान करायची इच्छा आहे.परंतु,आम्ही जिवंत असेपर्यंत काश्मीरला भारतापासून वेगळं होऊ देणार नाही.आम्ही जेएनयूमध्ये देश विरोधी बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले.तर राहुल गांधी त्यांना भाषास्वातंत्र्य आहे म्हणत भेटायला गेले. मी त्यांना सांगू इच्छितो,राहुल बाबा तुम्हाला देशद्रोह्यांशी ईलू ईलू करायची असेल तर करा, आम्ही करणार नाही.