सिद्धार्थ रमेश बर्डे (वय २१, रा. खोडद ता. जुन्नर जि. पुणे) आणि एक अल्पवयीन बालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागांत फिरून दुचाकीचोरीच्या गुन्ह्याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली होती. १३ जून रोजी खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, जुन्नर तालुक्यातील खोडद या गावात काही इसम काही एक कामधंदा न करता वारंवार विविध प्रकारच्या मोटारसायकल वापरत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोडद येथे सापळा रचला असता पोलिसांची चाहूल लागताच बर्डे हा पळून जाऊ लागला. पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील विविध कंपनीच्या ११ मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुणे आणि नगर भागातील नारायणगाव, रांजणगाव, आळेफाटा, पारनेर, श्रीरामपूर शहर येथून चोरी केलेल्या ११ मोटारसायकली हस्तगत केल्या असून, ८ गुन्हे उघडकीस आणले आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, दीपक साबळे, मुकुंद कदम, पोलीस शिपाई संदीप वारे, अक्षय नवले,नीलेश सुपेकर यांच्या पथकाने केली.
--
फोटो क्रमांक : १४ नारायणगाव अट्टल मोटारसायकलचोर
फोटो ओळ - पुणे आणि नगर जिल्ह्यांत धुमाकूळ घालणारे अट्टल मोटारसायकलचोर जेरबंद करून ११ मोटारसायकली पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या.