कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील बँक आॅफ महाराष्ट्र या बँकेचे अज्ञात चोरट्याने एटीएम मशिन फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. मात्र, एटीएम मशिनची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.शुक्रवार (दि.५) रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. बँक आॅफ महाराष्ट्राची शाखा कुरकुंभ-दौंड रोडवर एका टोकावर आहे. ही बँक निर्जन असलेल्या परिसरात असल्याने चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एकच व्यक्ती या वेळेस आढळत आहे. संपूर्ण पांढऱ्या रंगाचा कपडा व चेहरा झाकलेला कॅमेराच्या फुटेजमध्ये दिसत आहे. या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून महिनाभरात येथे वेगवेगळ््या प्रकारच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान याकामी पोलीसांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशीनची देखभाल ही एक इपीसी इलेक्ट्रानिक्स पेमेंट सिस्टीम नावाची खाजगी कंपनी करीत आहे. मात्र यां ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्या कारणाने मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे बेजबादारीने काम करणाऱ्या या खाजगी कंपनीवर कारवाईची मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे. निर्जनस्थळावरील एमटीला चोरट्यांनी लक्ष केले आहे. (वार्ताहर)
कुरकुंभला एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न
By admin | Published: December 06, 2014 4:16 AM