राजगुरूनगर: विवाहितेला कायम त्रास देत असल्याने सासु-सासऱ्याला विवाहितेच्या घराच्याकडून गंभीर मारहाण झाल्याची घटना चास गुंजवठा ता. खेड येथे घडली आहे. या घटनेत दोन्ही बाजुने परपस्परविरोधी खेड पोलिस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा पती नितीन भगवान टोके (रा. चास गुंजवठा) याने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, विवाहितीचे सासू अलका भगवान टोके, सासरा भगवान धोंडीबा टोके यांनी फिर्यादीची पत्नी रेशमा नितीन टोके हिला सांगितले, गुरांना चारा पाणी वैगरे दिले का असे विचारलेचा राग मनात धरून माहेरी हा प्रकार सांगितला.
दरम्यान मारूती बोत्रे, युवराज मारूती बोत्रे, शंकर बोत्रे, (रा.दावडी ता.खेड) श्रीराम कान्हूरकर (रा.पाबळरोड राजगुरूनगर) दत्ता पवार (रा.म्हाळूंगे ता.खेड) व इतर अज्ञात १० ते १२ जणांनी फिर्यादीच्या घरी जाऊन हातात लोखंडी राॅड, लाकडी दांडके घेऊन घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करून बेकायदा गर्दी जमाव जमवून फिर्यादीची आई अलका टोके व वडील भगवान टोके दोघांना लोखंडी रॉडने, दांडक्यांनी,लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण करून धमकी दिली.
दुसरी फिर्याद रेशमा नितीन टोके (रा. गुंजवठा चास) यांनी दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पती नितीन टोके, सासरे भगवान टोके, सासु अलका टोके, फिर्यादीची ननंद योजना कैलास पाटाडे, नाजुका उदय घोलप यांनी २०१५ पासुन वेळोवळी फिर्यादी सासरी नांदत असताना वेळोवळी लग्नात योग्य मानपान व दागदागिने न घातल्याने त्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी करून माझा शाररिक व मानसिक छळ केला.
फिर्यादी घरात असताना सासरे भगवान टोके यांनी हातात डिझेलची बाटली घेऊन घरात आले त्यापाठीमागे सासु अलका या घरात आल्या व त्यांनी फिर्यादीचे दोन्ही हात धरले व जिवे ठार मारण्याचे उद्शाने सासरे टोके यांनी फिर्यादीच्या अंगावर डिझेल ओतले. सासु अलका यांनी घरातील माचिस घेऊन साडी पेटविली ती साडी घरातील टपामधील पाण्यामध्ये बुडवुन विझविली असता पुन्हा त्यांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण केली. पुढील तपास खेड पोलिस करित आहे.