बाबू ऊर्फ कैलास दशरथ गेंगजे (रा. गोहे बु.), गोट्या ऊर्फ गफ-या ऊर्फ अशोक रखमा मदगे, गणेश बाळू पोटकुले, विशाल व दुसरा धराडे यांचे पूर्ण नाव माहीत नाही व इतर दोन व्यक्ती डिंभे खुर्द गावच्या हद्दीतील हॉटेल सागर बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये आले. आम्हाला उधार बिअर दे नाही तर दारू पिण्यास पैसे दे, असे म्हणून गल्ल्यातील ३ हजार ५३० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच हॉटेल मालकाचा मुलगा सचिन तुकाराम राक्षे यास शिवीगाळी, दमदाटी केली.
आरोपींनी टेबलावरील काचेचे ग्लास व बिअरची काचेची बाटली फोडून नुकसान केले. त्यातील एकाने बरोबर आणलेल्या बाटलीतील पेट्रोल ओतून हॉटेल पेटविण्याचा प्रयत्न केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहे.