याबाबत स्थानिक रहिवाशी प्रकाश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात ठाकर समाजाचे असलेले कळमजाई मंगल कार्यालयाचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ ते २० हजारांचे साहित्य लंपास केेले होते. बुधवारी (दि. १२) रात्री ९ च्या सुमारास ४ ते ५ चोरट्यांनी जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या लहान मुलाच्या अंगणवाडीचे खिडक्यांच्या काचा तोडल्या. तसेच दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. याचा आवाज तेथून जात असलेल्या तरुणांना आला. त्यांना चोरटे दरवाजा तोडताना दिसले. तरुणांची चाहूल लागताच पळून गेले.
माजी जिल्हा परिषद सदस्य बबन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात चोरट्यांनी ठाकर समाजाचे असलेले कळमजाई मंगल कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून २ एलईडी लाईट,साउंड बॉक्स, स्टूल, लाईटचे बल्प फोडले व काही साहित्य चोरून नेले होते. या महिन्यात नारायणगाव व परिसरात अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे व संशयित व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करावा.