बाणेर येथील बिटवाइज चौक सर्व्हिस रोड भूमिपूजन व सत्कार समारंभ तसेच आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच हेमंत रासने, नगरसेवक अमोल बालवडकर, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील आदी उपस्थित होते.
अमोल बालवडकर म्हणाले, बाणेर बालेवाडी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 24×7 योजना राबविली आहे. तसेच पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधून पाणी समस्येचे निराकरण करण्यात येणार आहे.
या प्रभागात विविध कामे ही केवळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक करत असतो, असेही त्यांनी सांगितले. ʻप्रामाणिक काम विकासावर ठामʼ, या माध्यमातून काम करत असताना विविध प्रश्न सोडविले. तसेच विविध रस्ते सुशोभित करून प्रभाग स्मार्ट कसा होईल यासाठी सदैव प्रयत्न केले आहेत. विरोधक कामामध्ये अडथळा निर्माण करत आहेत. त्यांनी तसे न करता स्वतःचा विकास दाखवावा. विकासकामे कोण करतो हे नागरिकांना चांगले माहीत असून त्याची प्रचिती येत्या निवडणुकीत नागरिक दाखवल्याशिवाय राहणार नाही, असाही टोला त्यांनी चमकोगिरी करणाऱ्या विरोधकांना लगावला.
यावेळी सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित तापकीर यांच्यासह पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे तीनशे जणांना आयुष्मान भारतचे कार्ड वाटप करण्यात आले.
पूनित जोशी, लहू बालवडकर, कृष्णा बालवडकर, राहुल कोकाटे, प्रकाश बालवडकर, उमा गाडगीळ, नारायण चांदेरे, सरपंच अपूर्वा निकाळजे, रणजित पाडाळे, मयूर भांडे, बेबी पाडाळे, काळूराम गायकवाड, दिशा ससार, विविध सोसायटीमधील चेअरमन आदी उपस्थित होते.