पुण्यात स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या महिला पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 02:26 PM2022-05-16T14:26:44+5:302022-05-16T15:40:19+5:30
स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस यांनी केला
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आले असताना महिला काँग्रेस ने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. स्मृती इराणी हॉटेल वर पोहच्याच्या आधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस यांनी केला.
मात्र यावेळी बीजेपी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून त्याना रोखलं आणि त्यांच्यात झटापट झाली. यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला नेलेला वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणी यांचा निषेध होत आहे.