शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

कोयत्याने वार करुन टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; गुलटेकडीमधील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 5:01 PM

जीएसटी गँगच्या प्रमुखाला अटक : डायस प्लॉटमधील घटना 

पुणे : पैसे न देता खाद्यपदार्थ घेऊन जात असताना विरोध केलेल्या सोनु शेखचा शोध घेत असलेल्या टोळक्याने दुसर्‍या तरुणावर कोयत्याने वार करुन जबर जखमी केले. 

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी उझेर हसीन खान (वय १९, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांचे गुलटेकडीत रब्बानी केटअर्स हे दुकान आहे. गोविंदसिंग टाक हा पैसे न देता त्यांच्या दुकानातील खादय पदार्थाचे घमेले घेऊन जात होता. त्याला सोनु शेख याने विरोध केला होता. या कारणावरुन २७ जुलै रोजी रात्री ९ वाजता टाक इतर पाच साथीदारांना घेऊन आला. त्याने हातात कोयते व पालघन हवेत फिरवून परिसरात दहशत पसरविली. 

फिर्यादी व त्यांचा नातेवाईक साहिल शेख हा त्यांना पाहून पळून जाऊ लागले. तेव्हा टाक याने त्यांना अडवून सोन्या किधर है, असे विचारुन साहिल यांच्या डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला असता साहिल मागे सरकला. त्यामुळे त्याचा वार हुकला. ते पाहून साहिल पळून जाऊ लागल्यावर टाक याने त्याच्या पाठीमागे कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच रुको, तुम नही बचोंगे असे मोठ मोठ्याने ओरडत फिर्यादी व साहील यांचे मागे धावत असताना फिर्यादी हे अंधारात टपरी खाली लपून बसले व साहिल हा आत गल्लीमध्ये पळत गेला.  परिसरातील लोक व हातगाडीवाले देखील त्यांना बघुन पळत होते. त्यानंतर गोविंदसिंग टाक हा डायस प्लॉट चौकात मोठया मोठ्याने ‘‘ये मेरा जीएसटी गँग है और उसका में भाई हुं, इस बस्ती में मेरा राज चलता है, और आगे चलता रहेगा, और मेरे खिलाफ जो पोलीस मे जायेगा उसको जिंदा नही छोंडुगा’’ असे ओरडत गोंविदसिंग व त्याचे साथीदार हातात कोयते व पालघन घेऊन नाचत होते. सहायक पोलीस निरीखक ए. के़. रसाळ तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस