बारामती :बारामती शहरात पंचायत समिती कार्यालय आज चर्चेचा विषय ठरले. कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने घरकुलाच्या ताब्याच्या कारणावरून उंदीर मारण्याचे औषध प्राशनकेले.बुधवारी(दि२०) सायंकाळी हा प्रकार घडला. पंचायत समितीमध्ये या ज्येष्ठाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली.अशोक फिलोमन दामले असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. दामले हे बारामती तालुक्यातील पणदरे येथील राहिवाशी आहेत. येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्याच समोर उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर दामले यांनापंचायत समितीच्या वाहनातून तातडीने येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सदानंदकाळे व त्यांच्या सहकाऱ्यानी दामले यांच्या पोटातील विष बाहेर काढले.तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने दामले यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पणदरे परिसरात गीतानगर परिसरात चाळीमध्ये दामले यांना शासनाकडून घरकुल देण्यात आले होते. ते गावामध्ये राहत नसताना दुसऱ्या व्यक्तीने हे घरकुल बळकावल्याची दामले यांची तक्रार आहे.या विरोधात दामले यांचा पंचायतसमिती,पोलिसांंच्या शासन दरबारी लढा सुरु होता. त्याला यश न आल्याने ते निराश होते.याच नैराश्यातुन त्यांनी टोकाची भुमिका घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.याबाबत गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले की,दामले यांनी हे पाऊल का उचलले हे कळाले नाही. दामले यांचे घरकुल त्यांच्या ताब्यात देखीलदेण्यात आले आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीतयासंबंधी बैठकही पार पडली आहे. घरकुल बळकावणा कडून काही त्रास होतअसल्यास तशी लेखी तक्रार द्या, असे उपविभागीय पोलिस अधिका?्यांकडून त्यांना सांगण्यात आले होते. पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर त्यांचाकोणताही विषय प्रलंबित नव्हता.---------------------
बारामती येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ज्येष्ठाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 3:27 PM
घरकुलाच्या कारणास्तव प्राशन केले उंदीर मारण्याचे औषध..
ठळक मुद्देतातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने प्रकृती सध्या स्थिर