बारामती : बारामती शहर परिसरातील जळोची अंबिकानगर येथील कचरा डेपोतील कचऱ्याची अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नशील राहू , असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जळोची प्रभागातील अंबिका नगर येथील गणेश मंदिराच्या सभामंडपाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. नगरसेवक अतुल बालगुडे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेते सचिन सातव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आशा माने, नगरसेवक अमर धुमाळ, नीलिमा मलगुंडे, युवती काँग्रेसच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, संभाजी होळकर, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, येथील कचरा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अंबिका नगर येथील नागरिकांनी लोक वर्गणीतून केलेले उल्लेखनीय व आदर्शवत कार्य आहे. नागरिकांनी वृक्षारोपण करून शासनामार्फत केलेल्या कार्याचे संरक्षण करावे. विकास कामांसाठी सहकार्य करावे.
--
फोटो ओळ: अंबिकानगर येथील सभा मंडपाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य.
२१०९२०२१ बारामती—०५
—————————————————