वेळू येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला होता. शासनाने २१ जून ते १ जुलै या कालावधीत सदर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भात व सोयाबीन या पिकाविषयी कृषी तंत्रज्ञान, फळबाग लागवड, गांडूळ रोड युनिट, नाडेप, कृषी यांत्रिकीकरण, महा डीबीटी पोर्टलवर अनेक अर्ज एक या ऑनलाइन सुविधा, साठवणूक व प्रक्रिया केंद्र, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात आली. जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम, गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांक, व मूलद्रव्य स्थिती, विकेल ते पिकेल या अभियानाअंतर्गत श्री संत शिरोमणी, संत सावतामाळी रयत बाजार या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयुक्त माहिती तसेच शासकीय कृषी योजनांची माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार, कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, राजेंद्र डोंबाळे, पर्यवेक्षक विजय शिशुपाल, अमर चव्हाण, उल्हास कोरडे, सरपंच आप्पासो धनावडे, सर्व सदस्य, भोर चे माजी उपसभापती अमोल पांगारे, पं. स. सदस्या पूनम पांगारे, माऊली पांगारे, प्रगतशील शेतकरी शिवाजी वाडकर, गुलाब घुले व शेतकरी वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते.