पुणे : वैधानिक दर्जा असलेल्या राज्य मागास आयोगाच्या सदस्यांना कोणत्याही पक्षपाती किंवा जातीय अजेंडा असलेल्या बैठका किंवा सभा, मेळावे यांना उपस्थित राहता येत नाही, असे असताना राज्य मागास आयोगाच्या तीन सदस्यांची विजय वडेट्टीवार यांच्या लोणावळ्यातील मेळाव्यात उपस्थिती आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा निपक्षपाती असतो सदरची घटना गंभीर असून घटनाविरोधी आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.
लोणावळ्यात शनिवार (दि.२६) ओबीसी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित होते. हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य देखील असून, घटनेनुसार अशा प्रकारे एखाद्या समाजाच्या राजकीय अथवा सामाजिक मेळावे, बैठकींना सदस्यांना उपस्थित राहता येत नाही, असे असताना वडेट्टीवार व भुजबळ यांच्या लोणावळ्यातील ओबीसी चिंतन बैठकीसाठीला लावलेली उपस्थिती प्रश्न निर्माण झाला आहे. आता याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.