शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

दौंडच्या पश्चिम भागात ९५ टक्केमतदान, निकालाकडे सर्वांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:36 AM

दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील डाळिंब, बोरीभडक व नांदूर या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच निवड प्रक्रिया होत असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.

यवत : दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील डाळिंब, बोरीभडक व नांदूर या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेतमतदान पार पडले. पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच निवड प्रक्रिया होत असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरासरी ९५ टक्के मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.डाळिंब येथे नऊ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, तर सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असून, दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होती. यात ग्रामदैवत परिवर्तन पॅनेलच्या सुनंदा मारुती कांबळे व वनिता अनिल धिवार यांच्यात सरपंच पदासाठी मोठी चुरशीची लढत आहे, तर नऊ जागांसाठी एकमेकांच्या विरोधात पॅनल उभे राहिले असून, प्रभाग क्र.१च्या मतदान केंद्रासमोर सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. यामुळे सदस्यपदासाठीदेखील मोठी चुरस असल्याचे बोलले जाते.बोरीभडक गावात आमने-सामने लढतीने निवडणुकीत रंगात आणली आहे. मोठे संवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जाणाºया बोरीभडकमध्ये निवडणुकीत कुरबुरी वाढलेल्या दिसतात. यावेळीदेखील कुरबूर पाहायला मिळाली. सून विरुद्ध सासू-सासरे अशी लढत येथे असल्याने परिसरात येथील निवडणुकीची मोठी चर्चा होती.येथे सरपंच पदासाठी अनुसूचित जातीसाठी पुरुष उमेदवाराला आरक्षण असून, दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे प्रशांत सिद्राम शेळके विरुद्ध जय मल्हार पॅनेलचे बाबूराव श्रीपती गजशिव यांच्यात चुरशीची लढत आहे.नांदूर येथे सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. येथे तीन उमेदवार सरपंचपदासाठी तुल्यबळ असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.महिला उमेदवार जिजाबाई अशोक थोरात, रेश्मा युवराज बोराटे व लता नरेंद्र थोरात यांच्यात येथे सरपंचपदासाठी लढत आहे.याचबरोबर सदस्यपदासाठी देखील वेगवेगळ्या पॅनेलमधून चांगली चुरस आहे.बोरीभडक येथे सासू-सासरे विरुद्ध सून या लढतीने मोठी रंगत आणली आहे.वॉर्ड क्र.४ मधून रेवती रणजित पवार या निवडणूक रिंगणातआहेत, तर त्यांच्या विरुद्ध असलेल्या पॅनेलचे नेतृत्व त्यांचे सासरे बाळासाहेब पवार व सासू शामल पवार करीत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही गटांत वाद झाले होते; त्यामुळे सदर वाद पोलीस ठाण्यातदेखील गेला होता.दौंड तालुक्याचा पश्चिम भाग पुण्याच्या अत्यंत जवळचा भाग असल्याने येथे दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे.तर येथील जमिनींचे बाजारभाव वाढलेले आहेत.याच माध्यमातून येथील नागरिकांमध्ये आर्थिक सुबत्ता आलेली असून, याची प्रचिती निवडणुकीत दिसून येत होती.मतदारांना विविध प्रलोभने याचबरोबर लक्ष्मीदर्शन देखील झाल्याची चर्चा होती.तर नांदूर ग्रामपंचायत लहान असली, तरी येथे औद्योगिक वसाहत असल्याने निवडणुकीत मोठे अर्थकारण दडले होते.शिरोली, कोरेगाव खुर्दला ८६ टक्के मतदानशिरोली : खेड तालुक्यातील शिरोली व कोरेगाव खुर्द या गावांत ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८६ टक्के मतदान झाले. शिरोली हे गाव संवेदनशील असल्याने निवडणुकीसाठी तेथे राज्य राखीव पोलीस बल (गट क्र. १ पुणे)चा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, उद्या (मंगळवारी) होणाºया मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह ग्रामपंचायतीच्या एकूण १२ जागांसाठी सोमवारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान झाले. येथील एकूण मतदान २ हजार ८३६ असून त्यापैकी २ हजार ४३५ मतदान पाच वॉर्डांत झाले असून, मतदानाची सरासरी टक्केवारी ८५.८८ आहे.शिरोली येथे मतदान सुरू असताना तहसीलदार सुनील जोशी, निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी श्रावण क्षीरसागर, खेडचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तर, पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिवसभरात पाच-सहा वेळा भेट देऊन येथे मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक कोकरे यांनी काम पाहिले.कोरेगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीचे एकूण मतदान १,२९९ असून त्यापैकी १,१२१ मतदारांनी हक्क बजावला असता तेथे मतदानाची सरासरी टक्केवारी ८६ टक्के राहिली. येथे ग्रामपंचायतीच्या एकूण ९ जागा असून त्यांपैकी ४ यापूर्वी बिनविरोध झाल्या. सरपंचपदासह अन्य चार जागांसाठी सोमवारी (दि. १६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शांततेत मतदान झाले. चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.वाड्यात मतदान केंद्रावर गर्दीवाडा : येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान असून, सकाळची वेळ असतानाही नागरिकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. नागरिक शांततेत मतदान करीत होते.मतदान शांततेत व्हावे, यासाठी पीएसआय लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाºयांनी नियोजन केले. इतर निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीला सर्वच मतदार उपस्थित राहावेत, यासाठी उमेदवार व सर्वच नागरिक प्रयत्न करीत असतात.एरवी बाहेरगावी मुंबई, पुणेआदी ठिकाणी असणारे ग्रामस्थही आवर्जून येतात. त्यामुळे मतदारराजा कोणाची दिवाळी गोड करणार, याकडे मतदान झाल्यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.काळवाडीत ८५ टक्के मतदानपिंपळवंडी : काळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता मतदान झाले. या ठिकाणी ८५ टक्के मतदान झाले.जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे दहा जागांसाठी मतदान झाले. या ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून या ठिकाणी प्रथमच नागरिकांमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.काळवाडी येथील दहा जागांसाठी एकूण २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. या ठिकाणी एकूण १ हजार ४५७ मतदारांपैकी १ हजार २४५ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये एकून ८५ टक्के मतदान झाले. हे मतदान शांततेत पार पडले.चासला ७९ टक्के मतदानचासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली चास येथे ७९ टक्के मतदान झाले, तर पापळवाडी येथे ८१ टक्के मतदान झाले. गारगोटेवाडी ग्रामपंचायतीसाठी चुरशीने चास, गारगोटेवाडी येथे मतदान झाले. दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. जनतेमधून सरपंच निवड होत असल्याने ही निवडणूक पश्चिम भागात पहिलीच असल्याने मतदारांचा उत्साह चांगला होता. चास येथे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने सहा महिला रिंगणात आहेत.मतमोजणी उद्या (मंगळवारी) खेड येथे सकाळपासून सुरु होणार आहे. चास व गारगोटेवाडीची निवडणूक चुरशीची झाली असल्याने ऐन दिवाळीत मतदारांना भाव आला होता. यामुळे मतदारांची दिवाळी सुरु होण्याआधीच दिवाळी साजरी झाली. एका मतासाठी चार ते पाच हजार रुपयांचा भाव आला होता.सकाळपासूनच कार्यकर्ते वयोवृद्ध तसेच अपंगांना मतदानाच्या केंद्रापर्यंत आणत होते. गारगोटेवाडी येथे दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी सरपंच कडूस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक अशोकराव गारगोटे यांच्या पत्नी अर्चना गारगोटे रिंगणात आहेत. तर जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर बच्चे यांच्या पत्नी रिंगणात आहेत. त्या मुळे निवडणूक ही दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती.