शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बेघरांकडे पालिका देणार लक्ष

By admin | Published: July 10, 2016 4:47 AM

रात्री-अपरात्री शहरात आलेल्या नागरिकांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या रात्र निवारे (नाईट शेल्टर) ची जनजागृती करण्यात येणार आहे.

पुणे : रात्री-अपरात्री शहरात आलेल्या नागरिकांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या रात्र निवारे (नाईट शेल्टर) ची जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय सध्या सुरू असलेल्या शेल्टरमध्येच महिलांनाही प्रवेश देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच बाहेरगावाहून येणारे नागरिक शहरात ज्या ठिकाणी उतरतात अशा परिसरातच हे रात्र निवारे उभारण्यासाठी प्राधान्य देऊन अशा जागांची लवकरच पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य समाजविकास अधिकारी गणेश सोनूने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रात्र निवाऱ्यांची स्थिती, निवारे सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच निवारे असूनही त्याबाबत होत नसलेल्या जनजागृतीमुळे बेघरांसाठी असलेली ही सुविधा चांगली असली तरी, त्याचा फायदा होत नसल्याची बाब ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे समोर आणली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शहरात रात्री-अपरात्री येणाऱ्या बेघरांना राहण्यासाठी व्यवस्था व्हावी या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने देशातील मोठ्या शहरांनी रात्र निवारे (नाईट शेल्टर) सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने शहरात चार ठिकाणी ही शेल्टर उभारली आहेत. मात्र, त्याची माहिती स्थानिक परिसरातील नागरिकांनाही नाही. त्यामुळे या प्रकल्पांची माहिती लवकरच स्वारगेट, शिवाजीनगर , पुणे स्टेशन बसस्थानकांसह शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहे. या माहितीमध्ये शेल्टरचा पत्ता, त्यासाठी असलेले नियम, तसेच शेल्टरकडे जाण्यासाठीचा नकाशाही लावण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात रात्री या ठिकाणी आलेल्या नागरिकांना तातडीने निवासासाठीची सोय कोठे उपलब्ध आहे, याची माहितीही मिळणार असून शेल्टरचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.महिलांसाठीही उघडणार दारे - महापालिकेकडून शहरात येरवडा, बोपोडी, पुणे स्टेशन तसेच सेनादत्त पोलीस चौकीच्या परिसरात हे शेल्टर उभारले आहेत. त्यातील सेनादत्त, तसेच येरवडा येथेच महिलांसाठी जागा आहे. मात्र, पुणे स्टेशन येथे अनेकदा कुटुंबेच येत असल्याने महिलांसाठी जागा नसल्यास पुरुषही त्या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे उर्वरित दोन्ही ठिकाणी महिलांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सोनूने यांनी स्पष्ट केले, तर यापुढील निवारे हे शहरात नागरिक ज्या ठिकाणी बस, रेल्वे अथवा खासगी वाहनांनी शहरात उतरतात अशा ठिकाणी निश्चित करून या जागांच्या नजीकच्या परिसरातच शेल्टर उभारली जाणार असून त्यासाठीचे सर्वेक्षणही लवकरच करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.