शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यवतमाळ संमेलनाकडे रसिकांचे लक्ष : संमेलनाध्यक्षपदाची कसर मुलाखतीतून भरून निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 3:02 AM

प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत नाव असलेल्या गणोरकर यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याचा बहुमान देत साहित्य महामंडळाच्या पदाधिकाºयांनी सुवर्णमध्यसाधला आहे. प्रभा गणोरकरयांनी एकीकडे महामंडळाच्या निर्णयावर नाराजीचा सूर लावत दुसरीकडे मुलाखतीचे आमंत्रणही स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११ ते १३ जानेवारी दरम्यान यवतमाळला होत आहे. अनेक वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदासाठी होत असलेली निवडणूक रद्द करून, सन्मानाने निवडीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. साहित्य महामंडळाच्या बैठकीत घटक संस्थांनी पाठवलेल्या नावांमधून बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून डॉ. अरुणा ढेरे तर विदर्भ साहित्य संघाने प्रभा गणोरकर यांचे नाव सुचवले होते. विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळाचे हे शेवटचे वर्ष असल्याने विदर्भाकडे संमेलनाध्यक्षपद राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, साहित्य महामंडळाच्या बैठकीत झालेल्या मतदानानंतर अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता संमेलनात प्रभा गणोरकर यांची विशेष मुलाखत आयोजित करून महामंडळाने कसर भरून काढल्याची चर्चा साहित्यक्षेत्रात आहे.यवतमाळ येथील संमेलनात मुलाखत आयोजित केली असल्याच्या वृत्ताला प्रभा गणोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. ‘आपल्या हातून एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे, अशा निश्चयातून ही संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.संमेलनाध्यक्षांच्या नावासाठी पुरुष साहित्यिकांचा विचारही झाला होता. मात्र, सन्मानाने निवड आणि महिला संमेलनाध्यक्ष अशी दोन प्रकारची क्रांती आपण करत आहोत, हे त्यांनी अधोरेखित केले, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. संबंधितांना कार्यक्रमाबाबत पत्रे पाठवण्यात आली आहेत. अंतिम स्वरूपावर पुढील दोन-तीन दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर कार्यक्रमपत्रिका जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे, सध्या कार्यक्रम अथवा मुलाखतीबाबत काहीही भाष्य करता येणार नाही.- डॉ. श्रीपाद जोशी,अध्यक्ष, साहित्य महामंडळराजकारण कधीही बंद होत नसते...महामंडळाने मुलाखतीबाबत कळवले आहे. एवढी वर्षे निवडणुकीने अध्यक्ष ठरत होता, तो आता निवडीने ठरणार आहे. त्यामुळे काहीच फरक पडलेला नाही. राजकारण कधीही बंद होत नसते. निवडणूक असो की निवड, राजकारण कायम असते. त्याचा केवळ चेहरा बदलतो, वरवरचे दृश्य बदलते. निवडीची चांगली गोष्ट आपल्याकडून घडावी, याबद्दल महामंडळाच्या मंडळींनी मनाशी आग्रह बाळगलेला दिसतो. आपल्या हातून एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे, अशा निश्चयातून ही संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. संमेलनाध्यक्षांच्या नावासाठी पुरुष साहित्यिकांचा विचारही झाला होता. मात्र, सन्मानाने निवड आणि महिला संमेलनाध्यक्ष अशी दोन प्रकारची क्रांती आपण करत आहोत, हे त्यांनी अधोरेखित केले.- डॉ. प्रभा गणोरकर, कवयित्री

टॅग्स :marathiमराठी