श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वा. अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली.
देवस्थानच्या वतीने दुपारी १२ वा. महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. श्रीरामनवमीच्या निमित्ताने पुजारी प्रसाद कुलकर्णी व देवस्थान ट्रस्टचे हिशोबनीस संतोष रणपिसे यांच्या वतीने श्री महागणपतीला २०१ किलो द्राक्षे अर्पण करून आकर्षक आरास करण्यात आली होती.यावेळी विश्वस्त डॉ संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून "श्रीं" ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू असल्याचे विश्वस्त डॉ. संतोष रामा दुंडे यांनी सांगितले.
रांजणगाव येथील श्री महागणपतीला द्राक्षांची आरास करण्यात आली होती.