शेटफळगढे : निरगुडे येथे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन दोन लाख लिटर पाणीसाठा होईल, अशी कामे श्रमदानातून केली आहेत. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या कामाची पाहणी करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला. या वेळी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी कंपार्टमेंट बल्डींगसाठी बैलजोडीच्या साह्याने नांगरणी केली. त्याबरोबर बांध घालणे , दगडी नाला बांध इत्यादी कामांत सहभागी होऊन गावातील लोकांना प्रोत्साहन दिले. आजपर्यंत गावात श्रमदानातून एक हजार वृक्ष खड्डे कंपार्टमेंट बल्डींग, दगडी बांध, खोलीकरण यांच्या माध्यमातून दोन लाख लिटर पाणीसाठा होईल, अशी कामे केली आहेत. तसेच, गावातील पाणीपातळी वाढली पाहिजे व गाव पाणीदार होण्यासाठी तरुण कमालीचे उत्सुक आहेत. पाणी फाउंडेशनच्या मदतीला भारतीय जैन संघटनेने गावाला जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये डिझेल भरून ओढाखोलीकरणाचे कामही सुरू केले आहे. या श्रमदानाच्या कामाची पाहणी पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी केली. तर, श्रमदान तीनशेहून अधिक लोकांनी केले. या वेळी सरपंच ब्रह्मदेव केकाण, गामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर काजळे, वंसत काजळे, कविता केकाण यांच्यासह अमर भोसले, हनुमंत काजळे, यशवंत केकाण, विराज भोसले, अनिल खाडे, रवी पवार, विनोद जगताप, सागर पानसरे, देवेंद्र राऊत, संभाजी गोसावी, ग्रामसेवक सुभाष बढे, तलाठी शिवराज देसटवाड इत्यादी उपस्थित होते. (वार्ताहर)
अतुल कुलकर्णींनेही केले श्रमदान
By admin | Published: April 26, 2017 2:47 AM