रसिकांची नव्या वर्षाची सुरुवात सांगीतिक व्हावी, या उद्देशाने गायिका अपर्णा केळकर यांनी स्वानंदी क्रिएशनद्वारे या मैफलीचा श्रीगणेशा केला. डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या साथीला भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋतुजा लाड आणि श्रुती अभ्यंकर (तानपुरा व स्वरसाथ) होते. कलाकारांचे स्वागत कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, एरा फूड्सचे देवेंद्र राक्षे, गंगोत्रीचे गणेश जाधव, राजेंद्र आवटे आणि संदीप चिपळूणकर यांनी केले. शशी व्यास, सुधीर निरगुडकर, पंडित रामदास पळसुले, माधव वझे, अभिनेता वैभव मांगले उपस्थित होते.
---
हा सांगीतिक माहोल दहा महिन्यांत अनुभवायला मिळालेला नाही. प्रत्यक्ष भेटीतून जे टिपता येते, शिष्याला गुरुकडून आणि गुरुलाही शिष्याकडून मिळवता येते. त्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद कलाकार आणि रसिकांना कुठल्याही व्हर्च्युअल भेटीतून मिळत नाही. सहकलाकाराकडून जी देवाण-घेवाण होते ते समाधान, तो आनंद व्हर्च्युअल मैफलीतून मिळत नाही.
- अश्विनी भिडे-देशपांडे, ज्येष्ठ गायिका