पुणे: कोरोना निर्बंधातील मदत म्हणून रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी लागणारी लिंक अखेर परिवहन विभागाने तयार केली आहे. या लिंकवर जाऊन परवाना क्रमाकांसह आधार कार्ड, बँक खाते क्रमांक तपशील दिला की दीड हजार रुपये बँकेत जमा होतील. सरकारी मदत जाहीर होऊन महिना झाला तरी रिक्षाचालकांना पैसे मिळत नव्हते. सरकारने अशीच मदत जाहीर केलेल्या फेरीवाला, घरेलू कामगार, इमारत बांधकाम मजूर यांच्या खात्यात पैसे जमा झाले तरी रिक्षाचालक मात्र उपेक्षितच राहिला होता. आता परिवहन आयुक्तालयाने लिंक तयार केल्याने ही मदत मिळू शकणार आहे. ही लिंक राज्यातील सर्व परिवहन विभागांना पाठवण्यात येणार असून सर्व रिक्षाचालकांसाठी ती खुली असेल. त्यावर जाऊन रिक्षाचालकाने स्वत:चा तपशील द्यायचा आहे की, त्याची छाननी होऊन पैसे संबधिताच्या बँक खात्यात जमा होतील. सरकारी नियमाप्रमाणे मदत थेट बँक खात्यात जमा करायची होती; पण एकाही रिक्षाचालकाच्या बँक खात्याचा तपशील परिवहन विभागाकडे नव्हता. दरम्यान, सरकारने पैसे खासगी बँकेत जमा केले. रिक्षाचालकाची मिरजेत आत्महत्यामिरज (जि. सांगली) : लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतून मिरजेतील राहुल चंद्रकांत बाणदार-जाधव (२३) या रिक्षाचालकाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रिक्षा व्यवसाय बंद होऊन उत्पन्न बंद झाल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. रिक्षाचे कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कर्जाचे हप्ते थकले होते. आम्हाला लिंक मिळाली की ती सर्व रिक्षाचालकांनाही कळवण्यात येईल. परवाना क्रमांकांची नावाची छाननी केली जाईल. वरिष्ठ कार्यालयाकडून यासंबंधात येणाऱ्या सूचनांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.”-अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीरिक्षा चालकांच्या नावावर कर्ज असते. खात्यात पैसे जमा झाले की बँक कर्जाच्या थकीत व्याजापोटी ते वर्ग करून घेतील. त्यामुळे रिक्षाचालकांंनी कर्ज नसलेले बँक खाते आधार कार्डशी जोडून घ्यावे व तोच खाते क्रमांक लिंकवर द्यावा.-आप रिक्षा संघटना
रिक्षाचालकांच्या मदतीची लिंक तयार, ७ लाख जणांंना प्रत्येकी १,५०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 9:46 AM