लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलांच्या गटात अवनीश चाफळे, अर्जुन किर्तने यांनी, तर मुलींच्या गटात उर्वी काटे, देवांशी प्रभुदेसाई यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित अवनीश चाफळेने अव्वल मानांकित नीव कोठारीचा ६-४ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. दुसऱ्या मानांकित अर्जुन किर्तनेने चौथ्या मानांकित विश्वजीत सणसचा ६-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित उर्वी काटेने निशिता देसाईचा ७-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाई हिने रितिका मोरेवर ७-२ असा विजय मिळवत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्य फेरी : मुले :
अवनीश चाफळे (३) वि.वि. नीव कोठारी (१) ७-४; अर्जुन किर्तने (२) वि.वि. विश्वजीत सणस (४) ७-१;
मुली : उपांत्य फेरी :
उर्वी काटे (१) वि.वि. निशिता देसाई ७-४,
देवांशी प्रभुदेसाई (२) वि.वि. रितिका मोरे ७-२.