शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरुन कोयत्याने केले वार; रामटेकडी येथे अल्पवयीन मुलांचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 6:22 PM

पैतरसिंग टाक याचा गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये खुन करण्यात आला होता.

पुणे : गेल्या वर्षी झालेल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोघा अल्पवयीन मुलांनी घरात शिरुन तलवारीने एकावर वार केले. घरातील टिव्ही, कपाटाची तोडफोड केली. रामटेकडी येथील विश्वरत्न मित्र मंडळाजवळ सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला. वानवडी पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी राजू एकनाथ थोरात (वय ४४, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैतरसिंग टाक याचा गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये खुन करण्यात आला होता. या कारणावरुन त्यांचे दोन अल्पवयीन भाऊ हे हत्यारे हवेत फिरवत थोरात यांच्या घराजवळ आले. त्यामुळे लोक घाबरुन तेथून पळून जाऊ लागले. थोरात यांच्या शेजारी राहणार्‍या घरात शिरुन या दोघांनी त्यांच्या घरातील साहित्यांची तोडफोड केली. त्यानंतर थोरात यांच्या घरात शिरुन ‘‘मेरे भाई पैतर को तुम सब लोगो ने मिलकर मार डाला़ अब मै किसीको जीना नही छोडुंगा’’ असे म्हणाला. त्यानंतर ते दोघे थोरात यांच्या घरात शिरले. थोरात यांना ‘‘तेरा लडका किधर है, उसे जिंदा नही छोडुंगा़ मेरे भाई के मर्डरमे उसका भी हात है,’’ असे म्हणून शिवीगाळ करु लागले. तेव्हा थोरात यांनी ‘‘माझ्या मुलाने काय केले आहे,’’ असे विचारल्यावर त्यांनी हातातील लोखंडी कोयता थोरात यांच्या डोक्यावर जोरात मारला असता, त्यांनी तो हुकवला. तो कोयता घरातील फ्रिजच्या दरवाजाला लागला. ते पाहून त्यांची पत्नी, मेव्हणी यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी घरातील टीव्ही, पाण्याचा माट, कपाटाची काच कोयत्याने फोडल्या. त्याचवेळी तेथे पोलीस आल्याचे पाहून कोयता तेथेच टाकून दोघे पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, भूषण पोटवडे  यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस