पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून यातील जेजुरी परिसरातील १२ ग्राम पंचायतींची निवडणूक शांततेत पार पडली. कोळविहिरे ८५ टक्के, जवळार्जुन ८४ टक्के, साकुर्डे ८२ टक्के, दौडज ८३ टक्के, धालेवाडी ९२ टक्के, बेलसर ८० टक्के, पिसुरटी ९२ टक्के, शिवरी ८२ टक्के, मावडी ८६ टक्के, राख ८३ टक्के, नाझरे कप ८७ टक्के तर खळद ८५ टक्के टक्के मतदान झाले आहे.
आज सकाळपासून मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. सकाळच्या वेळी मतदानाला वेग होता. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहावयास मिळत होत्या. दुपारी मतदानाचा वेग कमी होता. तर दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. मतदान केंद्रावरून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तर पुरंदर आरोग्य विभागाकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांची
तपासणी केली जात होती. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी साडेचार ते साडेपाच यावेळात मतदानाची सोय करण्यात आली होती. अशा रुग्णांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
साकुर्डे येथील मतदान केंद्रावर पुरेसे अंतर ठेवून मतदान केले जात होते .
केंद्रावर मतदारांची कोविड तपासणी करण्यात येत होती.