शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

गैरव्यवहारांना आळा; कर्मचाऱ्यांसाठी पुणे महापालिकेची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 3:28 PM

महापालिकेच्या विविध योजनांसाठी वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करताना होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी महापालिकेने आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी डीबीटी पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे महापालिकेच्या १० हजार कर्मचाऱ्यांपासून या योजनेला करण्यात येणार सुरूवातया नुसार लाभार्थ्याच्या बँकेतील खात्यावर थेट पैसेच जमा केले जातील

पुणे : महापालिकेच्या विविध योजनांसाठी वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करताना होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी महापालिकेने आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महापालिकेच्या १० हजार कर्मचाऱ्यांपासून या योजनेला सुरूवात करण्यात येणार असून त्यानंतर नागरिकांसाठीही अशीच पद्धत अमलात आणण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या योजनेचा आराखडा तयार केला आहे. काही विभागांमध्ये ती राबवण्यास सुरूवातही झाली आहे. महापालिकेचे वेगवेगळ्या विभागातील तब्बल १० हजार कर्मचारी महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेत असतात. शिपायांना गणवेश दिले जातात, महिला कर्मचाऱ्यांना साड्या घेतल्या जातात, स्वच्छता कर्मचाऱ्यांना गमबूट, मास्क, झाडू, खराटे, असे साहित्य वाटप केले जाते. अशा प्रकारच्या खरेदी कराव्या लागणाऱ्या बऱ्याच योजना आहेत. ही खरेदी निविदा करून केली जात असली तरी त्यात अधिकारी, ठेकेदार, लाभार्थी यांच्या स्तरावर अनेक गैरव्यवहार होत असतात.त्यालाच आळा घालायचा म्हणून ही पद्धत अमलात आणण्यात येत आहे. उगले यांनी सांगितले, की यात लाभार्थ्याच्या बँकेतील खात्यावर थेट पैसेच जमा केले जातील. तशी नोंद महापालिकेत होईल. त्यामधून त्याने त्याला हव्या त्या दर्जाचे कपडे खरेदी करायचे. महापालिकेने निश्चित केलेले रंग असावा इतकीच अट असेल. त्याला जास्त रक्कमेचा गणवेश खरेदी करायचा असेल तर महापालिकेने दिलेल्या रकमेशिवाय लागणारी जास्तीची रक्कम त्याने स्वत:च्या खिशातून घालायची आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. काही विभागात ते काम झाले असून त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवातही झाली आहे.महापालिकेकडे संबधित कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याची नोंद असल्यामुळे त्याला ते पैसे दुसरीकडे खर्च करताच येणार नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे गणवेश नसेल तर त्याचे वरिष्ठ त्याला जाब विचारू शकतील. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांना आवश्यक असलेले साहित्य खरेदी करून त्याचा वापर केला नाही तर त्यांच्यावरही कारवाई करता येईल. निविदा पद्धतीत प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष साहित्य वाटपाला बराच विलंब लागतो, त्यातही कोणी तक्रार केली की चौकशी सुरू होऊन सर्व प्रक्रियाच थांबते. या सर्व अनिष्ट प्रकारांना या नव्या पद्धतीत आळा बसेल. ठेकेदाराने साहित्य भांडारात जमा करायचे, कर्मचाऱ्यांनी तिथून घेऊन जायचे यातही विनाकारण कामाचे तास, मनुष्यबळ वाया जात होते. तेही आता जाणार नाही असे उगले यांनी सांगितले.महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने गणवेश वाटप करण्यात येते. यावर्षीपासून त्यांच्यासाठी हीच योजना कार्ड पद्धतीने वापरण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांना कार्ड देण्यात आले होते. ते स्वाईप केले की त्यांना गणवेश मिळणार होते, मात्र गणवेश पुरवणाऱ्या ठेकेदारांनी थेट शाळांमध्येच स्टॉल सुरू केल्यामुळे या योजनेत थोडा गोंधळ झाला. मात्र आता त्यातील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहे, त्यामुळे पुढील वर्षात हा गोंधळ होणार नाही असा विश्वास उगले यांनी व्यक्त केला. कर्मचाऱ्यांसाठी मात्र थेट त्यांच्या खात्यातच महापालिका पैसे जमा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे