चंदननगर : नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विमाननगर व्यापाऱ्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या न वापराता कागदी पिशव्यांचा वापर करण्याबाबत जागृतीची मोहीम राबविण्यात आली.क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विमाननगरमधील सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी जनजागृती करण्यात आली. प्लॅस्टिक पिशव्यांमुळे काय परिणाम होतात ती आरोग्यास हानिकारक असून ती वापरणे टाळावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी या वेळी केले. तसेच नागरिकांना कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रक्षिशण देण्यात आले.या वेळी नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विविध मापाच्या कागदी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले. या वेळी व्यापाऱ्यांनी कागदी पिशव्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला.याप्रसंगी क्षेत्रीय अधिकारी वसंत पाटील, ज्ञानेश्वर मोळक, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धेंडे, आरोग्य निरीक्षक शंकर जगताप, रोटरीचे डॉ. राजेश मनेरीकर उपस्थित होते (वार्ताहर)
प्लॅस्टिक टाळा, कागदी पिशव्या वापरा
By admin | Published: July 23, 2015 4:22 AM