पुणो : कॅन्टोन्मेंटच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी वॉर्डाची फेररचना केल्याने स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये ¨शपी आळी, ईस्ट स्ट्रीट, जुने मटण मार्केट, सेफी लाईन, ताबूत स्ट्रीट, भीमपुरा लेन, महात्मा गांधी रस्ता असा परिसर समाविष्ट आहे.
बोर्डाच्या अखत्यारीतील तक्रार याही वॉर्डात कायम असून, चटई निर्देशांक क्षेत्र (एफएसआय) वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात
बोर्ड प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने मोडकळीस आलेली
घरे या मतदारसंघात अनेक ठिकाणी आहेत. दोन किंवा तीन मजली
इमारत असल्यास ती पाडून नव्याने बांधताना एकच मजला बांधता येतो. त्यामुळे आहे त्याच घरांमध्ये राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
बोर्डाने मालमत्ता करात वाढ केल्यानेही नागरिकांची नाराजी आहे. हा मालमत्ता कर कमी केला जावा, अशी सर्वच नागरिकांची मागणी असल्याचे धनंजय उरड यांनी सांगितले.
लोकसंख्येची गजबज असलेल्या या मतदारसंघात मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करणो आणि उद्यान निर्मिती ही विकासकामे संकल्पित आहेत.
भीमपुरा येथे असलेल्या 1क्क् एकर ब्रिटिशकालीन जागेत घाण आणि मुतारी होती. या जागेचे आरक्षण बदलून त्या जागी क्रीडांगण तयार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सदस्य मंजूर शेख यांनी मांडला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या भागाचा कायापालट होऊ शकेल, असे मुबीन सय्यद, शहनवाझ नजीर शेख या स्थानिक नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या 6 वर्षामध्ये बोर्डाने 27 लाख रुपये खर्च करून पाण्याच्या 4क् वर्षापूर्वीच्या पाईपलाईन बदलल्या. घरोघरी नळकोंडाळी देण्यात आली आहेत.
(वार्ताहर)
4सात कोटी रुपयांचा खर्च करून ड्रेनेज लाईन बदलण्यात आल्या.त्यामुळे पावसाळय़ात गटारे तुंबण्याचा आणि रोजच अपुरा पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न निकाली निघाला.
4गेल्या 6 वर्षाच्या काळात बोहरी समाजाच्या सामाजिक उपक्रमांसाठी जमातखान्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून बोहरी आणि मुस्लिमांसाठी वानवडीत 3 एकर जागा दफनभूमीसाठी निश्चित करणत आली आहे.
4शिवाजी मार्केट येथील बंद असलेल्या स्टॉलपैकी 14 स्टॉल अपंगांना देण्यासाठी आपण खूप पाठपुरावा केला, असे मंजूर शेख म्हणाले.
1 निवडणूक मतपत्रिकांवर शिक्के मारून घेतली जावी, ही काँग्रेस व अन्य काही पक्षांची मागणी पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी आज फेटाळून लावली. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रंमध्ये (ईव्हीएम) गडबड केली जाते असल्याने मतपत्रिका छापून मतदान घेतले गेल्यास आम्ही आपले अभिनंदन करू, असे संबंधितांनी सांगताच मागे घेऊन जाणा:या निर्णयाबद्दल मला अभिनंदनाची गरज नाही, असे वक्तव्य पाटील यांनी केले.
2 काँग्रेस, भाजप, शिवसेना आदी पक्षांच्या प्रमुख कार्यकत्र्याना बोर्ड मुख्यालयात बोलावून निवडणुकीच्या आजवरच्या प्रवासाची माहिती देण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी आमदार रमेश बागवे, बोर्डाचे माजी सदस्य मंजूर शेख तसेच संगीता पवार यांच्यासह मेहेर इराणी, मि¨लंद अहिरे, आशिष वाघ, नितीन गाडे तसेच लष्कर व वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
3 बागवे यांनी प्रारंभी ‘ईव्हीएम’ची तपासणी सर्व पक्षांच्या उमेदवारांसमोर करावी, अशी मागणी केली. अहिरे यांनी मतदानपत्रिका वापराव्यात, अशी मागणी केली. बागवे यांनी लागलीच सर्व प्रगत देशांमध्ये मतपत्रिकांवर मतदान घेतले जाते; बोर्डाची निवडणूक या पद्धतीने घ्यावी यासाठी निवडणूक आयोगाला पत्र पाठवा, अशी आग्रही मागणी केली.
4छाजेड यांनी मतदान यंत्रे आधीच आणून ठेवावी लागतात, त्यांचे प्रात्यक्षिक दाखवावे लागते, असे पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच पाटील यांनी ईव्हीएमवरच निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली असून निवडणूक आयोग 99 टक्के परवानगी देणार आहे. प्रात्यक्षिकांसाठी अजून महिनाभराचा अवधी आहे, असे स्पष्ट केले.
5 बागवे यांनी वॉर्ड क्रमांक 6 आणि 7 मध्ये बनावट मतदान होते, असा आरोप करून लष्कराच्या कर्मचा:यांचे व अधिका:यांचे मतदान होत असताना त्यांची ओळखपत्रे तपासावीत, अशी मागणी केली. पाटील यांनी 9 प्रकारचे पुरावे ग्राहय़ धरले जातील, असे नमूद केले.
मतदान केंद्रांबाहेर ‘सीसी टीव्ही’
4गेल्या निवडणुकीत बनावट मतदान झाल्याची तक्रार करीत मतदान केंद्रांच्या बाहेर सीसी टीव्ही बसविण्याची व पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी मेहेर इराणी यांनी केल्यानंतर पाटील यांनी तशी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.