पुणे : माळीण गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी दुर्घटनाग्रस्त नागरिकांनी हाऊसिंग सोसायटी स्थापन करावी किंवा स्वत: इंदिरा आवास योजनेत घर बांधून शासनाकडून पैसे घ्यावे, असे पर्याय देण्यात आले आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून माळीण दुर्घटनाग्रस्त सोसायटी ही स्थापन करत नसून, इंदिरा आवासचा पर्याय ही त्यांना मान्य नाही. यामुळे सध्या जिल्हा प्रशासनासमोर पेच उभा राहिला आहे. जिल्हा प्रशासनाने घराचे काही टाईप प्लॅन तयार केले आहे. परंतु शासनाने घरांसाठी नियमानुसार प्रत्येकी केवळ दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले. याला पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने माळीण दुर्घटनाग्रस्तांनी सोसायटी स्थापन करुन शासनाची मदत व खाजगी कंपन्याच्या सीएसआर निधीतून किमान प्रत्येक कुटुंबाला ४९१ चौरस फुटाचे घर बांधून देण्यात येणार आहे. परंतु, सध्या ७२ पैकी केवळ २५ कुटुंबांनीच सोसायटी स्थापन करण्यास अनुकलता दाखवली आहे. याच लोकांची सोसायटी स्थापन करुन त्यांना घरे बांधून देणे आणि अन्य लोकांना इंदीरा आवास योजनेत २ लाख रुपये देण्याचा विचार सुरु असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सागंतिले.
माळीण दुर्घटना ग्रस्तांची सोसायटी करण्यास टाळाटाळ
By admin | Published: June 09, 2015 6:19 AM