- अतुल चिंचलीपुणे : कोणत्याही शहराची सांस्कृतिक उंची मोजायची असेल तर शहरात किती नाट्यगृहे आहेत, त्या संख्येवरून त्या शहराची सांस्कृतिक उंची ठरत असते. २०१४ मध्ये भारतातील अनेक शहरांमधून पुण्याची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली. या योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी या भागाचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आला. असे असले तरी स्मार्ट सिटीमध्ये एकही नाट्यगृह नसणे हे शहराच्या सांस्कृतिक कुपोषणाचे लक्षण म्हणावे लागेल.या भागात राहणाऱ्या लोकांना नाटक पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात यावे लागते. म्हणजेच जर नाटक पाहायचे असेल तर पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व नाट्यगृह, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर, टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर, कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण अशा ठिकाणी जावे लागते.मोकळ्या जागासोसायटीमध्ये राहणाºया रहिवासी लोकांकडून माहिती घेतल्यावर असे कळाले की, बाणेर भागातील पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, बालेवाडी पाण्याची टाकी, आतील भागातील सर्व डी.पी. रस्ते या ठिकाणी बºयाच मोकळ्या जागा आहेत. पण या जागेत प्रशासन काही लक्ष देत नाही. दोन-तीन वर्षे झाली त्या जागेत काही घडत नाही. मग लोक अशा मोकळ्या जागा पाहून त्या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात करतात व दुर्गंधी पसरते. प्रशासनाने या जागांचा थोडा विचार केला तर या ठिकाणी नाट्यगृह होऊ शकतेमहानगरपालिका नाट्यगृह व्यवस्थापकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या नाट्यगृहसंदर्भात बाणेर-बालेवाडी भागात कोणताही ठराव मंजूर झाला नाही. पुणे शहरात जी नाट्यगृह अस्तित्वात आहे, त्यावर सुधारणा करण्याचे काम चालू आहे.अपुरा निधीबालेवाडीच्या सर्व्हे नंबर १४ याठिकाणी दोन एकरच्या जागेत २०१२ खुला रंग मंचाचे काम चालू झाले होते. यासाठी पालिकेकडून निधीही मंजूर करण्यात आला होता. परंतु अपुºया निधीअभावी त्या रंगमंचाचे ३०टक्के काम पूर्ण झाले असून ७० टक्के काम अर्धवट राहिले आहे. त्या भागात या रंग मंचाची दोनच मजले पूर्ण झाली आहेत. २०१४ सालापासून हे काम पूर्णपणे थांबले असून भवन विभागातून दरवर्षी निधीसाठी प्रस्ताव मांडूनही निधीला मंजुरी मिळत नसल्याने कामाला सुरुवात होत नाही.स्मार्ट सिटी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार , बाणेर बालेवाडी हा भाग स्मार्ट सिटीच्या सुरुवातीला येत असल्याने स्मार्ट सिटी विकास योजनेत कुठल्याही ठरावाला मंजुरी मिळाल्याशिवाय त्यावर पुढे काम चालू होतंनाही. बाणेर बालेवाडीबद्दल स्मार्ट सिटी कार्यालयात त्या भागात नाट्यगृह करण्याचे काही नियोजन नाही. ज्या मोकळ्या जागा आहेत तेथे नाट्यगृह होऊ शकत नाही. कारण नाट्यगृह बांधण्यासाठी २ ते ३ एकरची जागा लागते. या भागात अनेक मोकळ्या जागा आहेत. परंतु या जागा फारच लहान असल्याने त्याठिकाणी इतर प्रकल्प आहेत.औंध भागात पंडित भीमसेन जोशी हे एकच सांस्कृतिक भवन आहे. बाणेर आणि बालेवाडी भागात कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक भवन किंवा नाट्यगृह नाही. बालेवाडी सर्व्हे नंबर १४ च्या जागेत जे सांस्कृतिक भवनाचे काम चालू होते, ते काही कारणाने बंद पडले आहे. भविष्यकाळात ते नक्कीच चालू होईल. - संदीप कदम,आयुक्त,औंध-बाणेर-बालेवाडीक्षेत्रीय कार्यालय
स्मार्ट सिटी नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत; दोन लाखांच्या लोकसंख्येसाठी एकही नाट्यगृह नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:59 AM