शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

कलावंतांच्या जागविल्या आठवणी

By admin | Published: April 26, 2016 1:25 AM

राजकारण्यांपेक्षा ते एक मनस्वी कलावंत होते. त्यांच्या हृदयाचा एक कोपरा कलावंतांसाठी सदैव ठेवलेला असायचा़ त्यांना शारदेचे वरदान होते.

पुणे : राजकारण्यांपेक्षा ते एक मनस्वी कलावंत होते. त्यांच्या हृदयाचा एक कोपरा कलावंतांसाठी सदैव ठेवलेला असायचा़ त्यांना शारदेचे वरदान होते. जातीपातींपलीकडे जाऊन त्यांनी राजकारण केले, व्यंगचित्रांच्या ताकदीवर त्यांचे नेतृत्व उभे केले़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक भाषणांचे संकलन असलेल्या ‘विचाराचं सोनं’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले़ या वेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ़ नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि़ द़ फडणीस, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणी जागविल्या़नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून त्या वेळी वाद झाला होता़ त्या वेळी मी पक्षाची काय भूमिका, असे त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले होते, की सन्मान मागायचा नसतो; मिळवायचा असतो़ जिथपर्यंत पुरुषांना जायची परवानगी आहे, तिथपर्यंत महिलांनाही परवानगी असायला हवी़ आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे़’’फडणीस म्हणाले, ‘‘एखाद्या सामान्य चित्रकाराने आपले व्हिझिटिंग कार्ड मातोश्रीवर पाठविले तरी त्याला लगेच प्रवेश मिळत असे़ त्यांच्या कुंचल्याचा प्रभाव जास्त होता़ ‘मार्मिक’मधून काढलेल्या व्यंगचित्रांतून त्यांचे नेतृत्व जन्माला आले़’’बर्गे म्हणाले, ‘‘बाळासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी असताना ते जो नाश्ता करीत तोच आम्हा पोलिसांनाही दिला जातोय ना, याकडे त्यांचे लक्ष असे़ सुरक्षेविषयी एखादी गोष्ट त्यांना सांगितली, तर तिचे ते पालन करीत़ गोरेगाव येथील सभा पोलिसांनी सांगितलेल्या धोक्याची जाणीव करून देताच त्यांनी रद्द केली होती़’’साहित्य दरबारच्या मनीषा धारणे यांनी स्वागत केले़ पुस्तकाचे संपादक हर्षल प्रधान यांनी मनोगत व्यक्त केले़ मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)महाराष्ट्रात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच स्वयंप्रकाशित नेते आहेत़ बाकीचे नेते दिल्लीचा प्रकाश पडला, की दिसतात.- रामदास फुटाणे