शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जर्मनीत भारतीयत्वाचा जागर, मराठी संस्कृतीचा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 7:48 PM

भारताच्या जर्मनीतील राजदूतांच्या कल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते..

पुणे : जर्मनीत गेल्या आठवड्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भारतीय संस्कृतीचा असा शानदार जागर करण्यात आला. 'मराठी पाऊल पडते पुढे...' या उक्तीनुसार दोन्ही कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रीय मंडळी आघाडीवर होती. या कार्यक्रमांच्या आयोजनामागे भारताच्या विविध प्रांतातील शाकाहारी खाद्यसंस्कृतीचे दर्शन जर्मन नागरिकांना घडवावे आणि तिथे नोकरी-व्यवसायानिमित्त आलेल्या भारतीयांना गावाकडचे पदार्थ चाखायला मिळावेत, असा दुहेरी हेतू त्यामागे होता. भारतीय संस्कृतीच्या वैविध्यपूर्ण दर्शनाने आपल्याच घरी पाहुणे म्हणून आलेले जर्मन नागरिकही भारावून गेले.  

जर्मनीची राजधानी बर्लिन इथे भारतीय दूतावासाने खाद्य महोत्सव आयोजित केला होता. निमित्त होते शिवरायांचा जन्मोत्सव व गणेश महोत्सव . भारताच्या जर्मनीतील राजदूत सौ. मुक्ता दत्त तोमर यांच्या कल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मराठी गडी बेभान होऊन लेझीम खेळले. तुळजामातेच्या नावाने 'गोंधळ' घालण्यात आला. डोळ्यांचे असे पारणे फिटले. मन तृप्त झाले. . अस्सल भारतीय चवीच्या विविध खाद्यपदार्थांचे 10-12 स्टॉल या महोत्सवात होते.त्यात चटकदार वडा-पाव, झणझणीत मिसळ, मधुर श्रीखंड, खमंग पाव-भाजी... कुणी दिल्लीच्या चाटवर ताव मारला, कुणी गुजराती गाजर हलवा नि पात्रा चाखला. कुणाला बिहारी लिट्टी-चोखा आवडून गेली, तर कुणाला चविष्ट सांबारात बुडी मारलेला मेदूवडा आणि इडली हवीहवीशी वाटली.  अशा नानाविध चविष्ट पदार्थांना खवय्यांनी उदार अंतकरणाने उदरस्थ केले!

भारताच्या राजदूत तोमर म्हणाल्या, दोन्ही देशांचे नागरिक जवळ येण्यास आणि त्यांच्यातील सुसंवाद वाढण्यास यातून मदत होते. जर्मनी व भारत यांचे फार पूर्वी पासून चांगले संबंध आहेत. अशा कार्यक्रमांमुळे ते वृद्धिंगत होतात व दोन्ही देशांतील वीण अधिक मजबूत होते. महोत्सवात स्टॉल लावणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

या खाद्यमहोत्सवात सर्वाधिक लक्षवेधी ठरला स्टॉल क्रमांक 4 - बर्लिनच्या मराठी मित्र मंडळाचा स्टॉल. मूळच्या नगरच्या सुवर्णा ओंकार कलवडे यांनी बनविलेल्या खमंग वडा-पाववर पाहुणे खूश झाले. अन्य मराठी पदार्थही त्यांना आवडले. महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून उद्योजक ओंकार कलवडे, रोहित प्रभू, अन्विता प्रभू, अमोल सैनिस, केतकी सैनिस, शैलजा पाटील, दीपक पाटील, शिरीष पंडित आदी आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करीत होते. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व मराठमोळे पदार्थ या सर्वांनी स्वत:च्या घरी बनवले होते. गोड, आंबट, मसालेदार, चमचमीत, झणझणीत... असे पन्नासहून अधिक पदार्थ इथे चाखायला मिळाले. सोबत होते थंडगार कोकम सरबत.  गणेशवंदना सादर झाल्यावर जमलेल्या सर्वांनीच मोठ्या उत्साहाने 'गणपतीबाप्पा मोरया' असा गजर केला! कथक, भरतनाट्यम्, गरबा, भांगडा अशी नृत्ये,  शास्त्रीय संगीत, लोकसंगीत असे विविध बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. मराठी व भारतीय मंडळी  दूरदूरवरून या महोत्सवासाठी आली होती. त्यांची गर्दी, गाणी, आनंद, उत्साह यामुळे कार्यक्रमाला एखाद्या लग्नसोहळ्याचे स्वरूप आले आणि सारे व?्हाडी अर्थातच तृप्त झाले................फ्रँकफर्टचा 'फेस्ट'!दूतावासातील खाद्यमहोत्सवाच्या आदल्याच दिवशी, म्हणजे 31 आॅगस्ट रोजी फ्रँकफर्ट येथील रोझ मार्केटमध्ये 'इंडियन फेस्ट'चे आयोजन करण्यात आले होते. फ्रँकफर्ट येथे स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींनी तेथे 2014पासून 'मराठी कट्टा' सुरू केला आहे. सारे कट्टेकर या फेस्टमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. मराठमोळ्या पदार्थांचा खास स्टॉल होता आणि त्याच्यासमोर उभी केलेली भरजरी गुढी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. चटकदार शाकाहारी-मांसाहारी पदार्थ खाऊन आणि मसाला चहा, मँगो लस्सी पिऊन सर्वांनीच कट्ट्याची वाहवा केली.

फेस्टनिमित्त मराठी कट्टाने उद्योजकांसाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला होता. जर्मनीत उद्योग-व्यवसाय सुरू केलेल्या मराठी माणसांची माहिती सर्वांना मिळावी, त्यांना आपल्या व्यवसायाची माहिती सर्वांना देता यावी, यासाठी खास स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. अहमदनगरच्या ओंकार चंद्रकांत कलवडे यांचा स्टॉल तेथे होता. त्यांनी पाच वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये 'मॅट्रिक्स स्ट्रक्चर्स'ची मुहूर्तमेढ रोवली. त्याची मुख्य शाखा वेर्निंगरोड येथे असून, दुसरी शाखा अहमदनगर येथे सुरू करण्यात आली आहे. ........

टॅग्स :PuneपुणेGermanyजर्मनीmarathiमराठीfoodअन्न