पुणे: आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सी व्हीजील अॅपवर तक्रारी करणा-या मतदारांची संख्या पुण्यात सर्वाधिक असली तरी काही मतदार हाय...,हॅलो...असे एसएमएस पाठवत आहेत. तर काही स्वत: चे सेल्फी अपलोड करत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, बहुतांश जागृक मतदारांकडून अॅपवरून आचारसंहिता भंगाच्या अचूक तक्रारी देवून जिल्हा प्रशासनाला चांगलेच कामाला लावत आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सी-व्हीजिल अॅपच्या माध्यमातून सर्व सामान्य मतदारांना आपल्या परिसरातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या अॅपच्या माध्यमातून प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने तक्रार देता येणार आहे.आचारसंहितेच्या काळात शासकीय कामांचे किंवा राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या कामांचे फलक लावता येत नाही. परंतु,अजूनही एखाद्या मतदार संघात अशा प्रकारचे फलक लावलेले असू शकतात. या फलकांचे छायाचित्र काढून अॅपवर अपलोड करता येते. तसेच उमेदवाराचा प्रचारकरताना मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वस्तू ,पैसे आदीचे वाटप होत असल्याचे व्हीडिओ किंवा छायाचित्रही अॅपवर अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.निवडणूकीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी,या उद्देशाने सी-व्हिजीलचा वापर होणे अपेक्षित आहे. परंतु, हाय, हॅलो आणि सेल्फी अपलोड करण्याबरोबरच माझे मतदार यादीत नाव नाही. मी काय करू,अशा स्वरूपाची विचारणा अॅप वरून केली जात आहे. त्यामुळे अजूनही काही मतदारांमध्ये सी व्हिजील बाबत जागृकता नसल्याचे दिसून येत आहे.परंतु,पुण्यात या अ?ॅपवर कसबा पेठ ,चिंचवड,भोसरी आदी ठिकाणांहून सर्वाधित तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
आवरा रे..! आचारसंहिता भंग तक्रारींसाठीच्या सी- व्हीजिल अॅपवर सेल्फी, हाय, हॅलो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 1:59 PM
सी व्हीजील अॅपवर तक्रारी करणा-या मतदारांची संख्या पुण्यात सर्वाधिक असली तरी काही मतदार हाय...,हॅलो...असे एसएमएस पाठवत आहेत.
ठळक मुद्दे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सी- व्हीजील अॅप उपलब्धनिवडणूकीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी,या उद्देशाने सी-व्हिजीलचा वापर होणे अपेक्षित