पुणे : ज्ञानदेवी चाईल्डलाईन तर्फे फ्लाईट लेफ्टनंट हेमंत सहस्त्रबुद्धधे स्मृति चाईल्डलाईन मित्र पुरस्कार ‘पुणे ग्रामीण पोलीस’ आणि पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश केंगार यांना देण्यात आला.
मुलांच्या क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती आणि संस्थेस फ्लाईट लेफ्टनंट हेमंत सहस्त्रबुद्धधे स्मृति चाईल्डलाईन मित्र पुरस्कार, बालसखा पुरस्कार आणि चाईल्डलाईन पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोना काळातील निर्बंधामुळे तीन वर्षांनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एअर फोर्स असोसिएशनचे अध्यक्ष ग्रुप कॅप्टन (निवृत्त) सुहास फाटक तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धधे उपस्थित होत्या.
यावेळी बालशल्यविशारद व ससूनच्या विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले, संध्या कुलकर्णी, एकेएस संस्थेच्या बरखा बजाज व बालरंजन केंद्राला ‘बालसखा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. गतिमंद मुलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन काम मिळविण्यासाठी सुविधा निर्माण करून दिल्याबददल अथर्व राजे, कोरोना काळात युवागट स्थापन क रण्याबरोबरच घरी परतणा-या मजूर/बेघर कुटुंबांना अन्न दान करणारे विजय जाधव आणि सेक्स रँकेट शोधून काढणारी मृण्मयी मोडक यांना ‘चाईल्डलाईन गौरव पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात गंमत शाळेची मुले आणि चाईल्डलाईन कार्यकतर््यांची प्रार्थना मृण्मयी मोडक हिने सादर केलेले गणेश कौतुकम व चिमुरड्यांच्या नृत्याने झाली. संस्थेच्या संचालिका डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धधे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली.
--------------------