या वेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, माझे वडील सुभाष अण्णा कुल यांचा स्मृतिदिन ४ जुलै रोजी होता, त्यादिवशी मला या पुरस्कारासंदर्भाचे पत्र राज्य शासनाकडून प्राप्त झाले. माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. सुभाष अण्णांकडून मी घेतलेले जनसेवेचे व्रत व संघर्षाचे बाळकडू येऊनच पुढे वाटचाल सुरू केली. २०१४ पासून दौंड तालुक्यातील जनतेसाठी केलेल्या कामाची पावती या पुरस्काराच्याा रुपाने मिळाली. लोकशाहीचे आयुध वापरून गेल्या पंचवार्षिकमध्ये विधानसभेत ८०० पेक्षा अधिक प्रश्न मांडले. अनेक महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभाग घेतला. नेहमी सापत्नभावाची वागणूक मिळणाऱ्या दौंडची स्वाभिमानी दौंडकर ओळख जपली. पुरस्कार म्हणजे माझे वडील स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांना श्रद्धांजली, तसेच दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला हा पुरस्कार मी समर्पित करतो. भविष्यामध्ये सुजलाम् सुफलाम् दौंड घडवणे हेच माझे ध्येय आहे.
०७ केडगाव
रामराजे नाईक निंबाळकर यांनी राहुल कुल यांना पुरस्काराने सन्मानित केले.