आळंदी : चऱ्होली येथे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी पुणे अंतर्गत ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, आळंदी व चऱ्होली अंगणवाडी बीटच्या संयुक्त विद्यमाने पगडेवस्ती या अंगणवाडी केंद्रात जागतिक पोषण कार्यक्रमात पथनाट्य, पोषणाबद्दल प्रश्नोत्तरे स्पर्धा, किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्यात पोषण आहारविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सुमारे पन्नासहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
यात सहभागी महिलांनी पोषणयुक्त आहार बनवून त्यांच्यात स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच गरोदर मातेचे ओटीभरण करून आहारात समाविष्ट करावयाच्या पोषणाबद्दल जनजागृती केली. यावेळी सुधीर साळवी, अनिता लांडे, कल्पना थोरवे, आशा सावंत, मंदाकिनी कुंभार, सारिका थोरवे, अलका जाधव, उज्ज्वला थोरवे, राजश्री गायकवाड, सीमा केवळ, लता पगडे, सीमा पवार, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विभागप्रमुख कम्युनिटी मेडिसिन डॉ. अमिताभ बॅनर्जी यांनी विशेष सहकार्य केले. डॉ. श्वेता गांगुर्डे, डॉ. श्यामकांत कुलकर्णी, डॉ. योगेश कवाने, जोसफ चेरियन, प्रवीण कोल्हे, लता खंदारे, रामदास भाकरे सर्व इंटन्स व सर्व स्टाफ यांनी सहभागी होत कार्यक्रम यशस्वी केला.