महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यासाठी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत, प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने शेतकऱ्यांना मातीचा नमुना कसा घ्यावा, कोणत्या ठिकाणचा घ्यावा, कोणत्या ठिकाणचा घेऊ नये, मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी करायचे उपाय, आवश्यक अन्नघटक व त्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे याविषयी प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले.
या वेळी तुकाराम कोतवाल, संपत घुले, दत्ता वायकर, सुखदेव इंदलकर, गणपत गायकवाड व इतर शेतकरी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ३० पिंपरी सांडस माती परीक्षण
फोटोच्या ओळी : माती परीक्षण करताना कृषिकन्या निकिता घुले व शेतकरी.
300721\30pun_1_30072021_6.jpg
फोटो क्रमांक : ३० पिंपरी सांडस माती परिक्षण फोटोच्या ओळी :-कृषीकन्या निकिता घुले माती परिक्षन करताना व शेतकरी