इंदापूर शहरातील सर्वच वार्डात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात प्रभाग क्रमांक एक मधून मंगळवार ( दि. ६ ) रोजी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, आरोग्य समितीचे सभापती अनिकेत वाघ, वीज व वृक्ष संवर्धन सभापती सुवर्णा मखरे, नगरसेवक प्रशांत सिताप यांनी घरोघरी जाऊन प्रभागातील नागरिकांची विचारपूस करत त्यांना आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे व सुरक्षा घेणे विषयी मार्गदर्शन केले.
तसेच ज्या घरामध्ये ४५ वयाच्या पुढील नागरिक आहेत, त्यांनी कोविड लसीकरण करून घेण्यासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णाल येथे नाव नोंदणी करून लसीकरण करून घेण्यास विनंती करण्यात आली. तसेच कोविड लसीकरणाने आपल्या जीवितास अजिबात धोका नाही. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे आदेशांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, सामाजिक कार्यकर्ते नितीन मखरे, सभा अधीक्षक गजानन पुंडे, आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, वॉर्ड ऑफिसर मोहन ढोबळे, राजू भानवसे, दशरथ क्षीरसागर, अल्ताफ पठाण, भागवत मखरे, अशोक चिंचकर, सुधीर पारेकर आदी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते
इंदापूरमध्ये लसीकरणबाबत जनजागृती करताना नगराध्यक्षा अंकिता शहा व मान्यवर.