जुन्नर तालुक्यातील दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार, अनाथ लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यात बच्चू कडू संचलित प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने शासनाच्या विविध कार्यक्रम, योजना, अभियान आदींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे त्यासाठी विविध कागदपत्रांची जमावजमव करून शासनाकडे रीतसर अर्ज देणे, लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेपर्यंत प्रत्यक्ष मदत करणे आदी कामे या जनजागृतीद्वारे केली जात आहेत.
डुंबरवाडी, आळे, राजुरी, बेल्हा, बांगरवाडी या गावांतून सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात दिव्यांग लोकांमध्ये शासनाने २१ प्रकारचे नवीन आजार असलेल्या लोकांना समाविष्ट केले आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, समाज कल्याण व व्यवसाय सुरू करण्याकरिता, लघुउद्योगाकरिता बँक कर्ज व तयार केलेल्या मालाचे मार्केटिंग, अंत्योदय राशन कार्ड, संजय गांधी पेन्शन योजना, दिव्यांग ऑनलाइन प्रमाणपत्र, मोफत युडीआयडी (युनिक कार्ड), आरोग्य विषयी, दिव्यांग लोकांना व ज्येष्ठ नागरिक यांना मोफत साहित्य वाटपाची नावनोंदणी करून व विविध योजनांची माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम राज्य समन्वयक गौरव जाधव, नयन पुजारी, राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण व अरुण शेरकर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून, यावेळी रुग्णसेवक दीपक चव्हाण, अरुण शेरकर, राहुल मुसळे, ज्ञानदेव बांगर, मंगेश भुजबळ, ओमकार शिंदे, नरसिंग कलोसिया, तबाजी आरोटे, बाबाजी औटी, शिल्पा शिंदे, जालिंदर बांगर आदी उपस्थित होते.
---