तळेगाव ढमढेरे येथील सावतामाळी मंगल कार्यालयात शिक्रापूर स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने जागतिक कृषी महोत्सव सप्ताह अंतर्गत एक दिवसीय जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे,ॲड.यशवंत ढमढेरे, सेवानिवृत्त विस्ताराधिकारी श्रीकांत ढमढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ ढमढेरे,संतोष ढमढेरे, माजी उपसरपंच विजय ढमढेरे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस सुनील ढमढेरे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीपती भुजबळ, सचिव सुभाष सातकर, सचिन बाळसराफ, मंत्रालय अव्वर सचिव किशोर जकाते, सर्जेराव ढमढेरे, दुर्गेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी किशोर रकाते,जयश्री विसपुते, नीता भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. यावेळी सेवेकरी महिलांनी वर्षभरातील सण-समारंभ संदर्भात उत्कृष्ट साहित्य प्रदर्शनातून जागृती केली तर स्वामी समर्थ सेवा मार्गाचे १८ विभागाच्या कार्याची माहिती सांगितली. बालसंस्कार वर्गातून कृषिविषयक सांस्कृतिक कार्यक्रम व स्वयंरोजगार विभागाअंतर्गत सेंद्रिय साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
याचा लाभ परिसरातील शेतकरी व स्वामी समर्थ केंद्राच्या महिला वर्गाने घेतला.
:तळेगाव ढमढेरे येथे जागतिक कृषी महोत्सव सप्ताहानिमित्त नृत्यकलेचा माध्यमातून जनजागृती करताना बालकलाकार