शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘ट्रायल रूम’ने केली जागरूकता

By admin | Published: April 10, 2015 5:39 AM

‘ट्रायल रूममध्ये जाताय राहा सावध’ ‘लोकमत’च्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे पडसाद शहरात उमटले.

पिंपरी : ‘ट्रायल रूममध्ये जाताय राहा सावध’ ‘लोकमत’च्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे पडसाद शहरात उमटले. विविध महिला संघटना तसेच सजग नागरिकांनी याची दखल घेतली. शिवसेना महिला आघाडीच्या गटनेत्या सुलभा उबाळे व पदाधिकाऱ्यांनी मिळून मॉलमधील चेजिंग रुमची पाहणी केली. तसेच शहरातील मॉलच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले. महिला सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करावा, उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शहरातील मॉलमधील सुरक्षेची पाहणी लोकमत टीमने केली. ट्रायल रूम असुरक्षित आहेत, याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला संघटनांनी ‘लोकमत’च्या जागरूकतेबद्दल धन्यवाद दिले. शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील फु गेवाडी, काळेवाडी, आकुर्डी, मोरवाडी, पिंपरी या दुकानांची आणि मॉलची पाहणी केली. दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत ही पाहणी सुरू होती. त्यात गटनेत्या उबाळे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या सुशीला पवार, वेदश्री काळे, वैशाली मराठे, मंगला घुले, शशिकला उभे, स्वरूपा खातेकर, जनाबाई गोरे, वंदना गायकवाड, बेदी सय्यद, शारदा वाघमोडे, पुष्पा तारू, रागिणी प्रभू, ललिता सोलंकी, निर्मला पाटील, अनित तुतारे, मंगला भोकरे, नंदा दातरकर, सुधा नाईक, सुनंदा सावंत, संगीता उत्तेकर यांनी मॉलची पाहणी केली. शिष्टमंडळाने छुपे कॅमेरे तसेच महिला सुरक्षा रक्षक कशा प्रकारे काम करत आहेत, याची पाहणी केली. काही मॉलचालकांनी अरेरावीची भाषा वापरली. कायदे हातात कशाला घ्यायचे, असेही कार्यकर्त्यांना सुनावले. मोरवाडी येथील मॉलच्या मालकांसह सुरक्षारक्षक महिलांनी लोकमतच्या जागरूकतेबद्दल आभार मानले. महिला सुरक्षेची खरी गरज आहे, असे सुरक्षारक्षक महिलांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या निवेदनाची दखल घेतली जाईल. सुरक्षा व्यवस्था ही वाढविण्यात येईल, असे मॉल चालकांनी या वेळी शिष्टमंडळास सांगितले. दरम्यान काही मॉल चालकांनी मॉलमधील सुरक्षेची माहितीही शिष्टमंडळास दिली. उबाळे म्हणाल्या, ‘‘महिलांच्या सुरक्षेबाबत ‘लोकमत’ने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. जागरूकतेबद्दल महिला वर्गाच्या वतीने धन्यवाद द्यायला हवेत. मॉलमधील ट्रायल रूममधील छुप्या कॅमेऱ्यामुळे अनेक गैरप्रकार घडू शकतात.महिला व मुलींनी जागरूक असायला हवे. महिला सुरक्षेबाबत सूचनाही केल्या आहेत.’’(प्रतिनिधी)