शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

‘आव्वाज’ ढोलताशांचाच, विविध मंडळांचे मनसोक्त वादन; बाप्पा मोरयाचा अखंड उद्घोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:17 AM

रात्री बाराच्या सुमारास स्पीकर बंद करण्यात आल्यानंतर, अनेक रस्त्यांवरील गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती; मात्र लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी वाढत गेली.

पुणे : रात्री बाराच्या सुमारास स्पीकर बंद करण्यात आल्यानंतर, अनेक रस्त्यांवरील गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती; मात्र लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी वाढत गेली. स्पीकर बंद असल्याने लक्ष्मी रस्त्यावर सिटी पोस्टाजवळ, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्याकडून येणारी मंडळे थांबविण्यात आलेली होती. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावर ढोल ताशा पथकांचे दणक्यात वादन सुरू होते.समर्थ पथक, शिवगर्जना, शिवप्रताप, रुद्रगर्जना, शिवमुद्रा, श्रीराम पथक, स्वरूपवर्धिनी, आदिमाया, आवर्तन, श्री गजलक्ष्मी, नादब्रह्म, नूमवि पथक, शिव साम्राज्य, सूर्य पथक, उगम पथक, शिवताल, ताल, कलावंत, रमणबाग, कामायनी, शौर्य, चेतक, हिंद तरुण मंडळ आदी पथकांनी लक्ष्मी रस्त्यावर मनसोक्त वादन केले.रात्रीच्या शांत वातावरणात गणपती बाप्पा मोरयाचा उद्घोष आणि ढोलताशांचा आसमंत भेदणारा ताल हे यंदाच्या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य होते. एकापाठोपाठ येणाºया वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकांमुळे लक्ष्मी रस्त्याच्या वैभवात आणखीनच भर पडली. ‘ढोलावर आदळणारे टिपरू आणि ताशावर विजेच्या वेगाने पडणाºया काड्या’ आणि त्यामधून निर्माण होणाºया ठेक्यावर नाचणारे ध्वज, नागरिकांच्या टाळ्या, वादकांना दिले जाणारे प्रोत्साहन, वादकांचे पारंपरिक वेष, महिला वादकांच्या डोक्यावर आकर्षक फेटे, नाकात नथ, कपाळी चंद्रकोरयामुळे वातावरणाची निर्मिती झाली होती.लक्ष्मी रस्त्यावर आनंदोत्सवाचे दर्शनलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आकर्षक फुलांच्या रथात विराजमान झालेले गणराय...गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांच्या गर्दीने फुललेले रस्ते...ढोलताशा पथकांचा गजर, डीजेचा दणदणाट..गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा वातावरणात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक २५ तास ५ मिनिटे रंगली. मिरवणुकीचा आनंदोत्सव ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच लक्ष्मी रस्त्यावर गर्दी केली होती.लोखंडे तालीम, साखळीपीर तालीम मंडळ, नगरकर तालीम मित्र मंडळ, जनाई पवळे संघ, होनाजी तरुण मंडळ, नातूबाग मंडळ, शनिपार मंडळ, विजय क्रिकेट क्लब, जय बजरंग मित्रमंडळ, श्री दत्त तरुण मंडळ, शिवशक्ती मंडळ, गणपती चौक मित्रमंडळाचा लक्ष्मी रोडचा राजा, बाल विकास मंडळ, सराफ सुवर्णकार गणपती ट्रस्ट, जय बजरंग मित्रमंडळ, मुंजाबाचा रोड तरुण मंडळ आदी मंडळांनी देखणे विसर्जन रथ आणि आकर्षक देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मुंजाबाचा बोळ तरुण मंडळाने सर्कशीतील खेळांचा जिवंत देखावा सादर केला होता. या देखाव्याने चिमुरड्यांचे लक्ष वेधून घेतले. एकीकडे सर्कशीचे खेळ लोप पावत असताना आणि मुले सोशल मीडिया, गेमच्या आहारी जात असताना या खेळाचे महत्त्व या जिवंत देखाव्यातून अधोरेखित झाले.रथाच्या मध्यभागी हलता जोकर, विविध खेळ करणारे माकड, थरारक प्रात्यक्षिके करणाºया तरुणी आदींचा या देखाव्यामध्ये समावेश होता. चिमुकल्याला खांद्यावर बसवून मिरवणूक दाखवणारे आई-बाबा आणि कुतूहलाने विदुषकाकडे पाहून चमकणारे चिमुरड्यांचे डोळे असे चित्र या वेळी पाहायला मिळाले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन