पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका गेट विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यासाठी बायोमेट्रिक नोंदणी केली जाणार असून, नोंदणी केलेल्यांना ११ फेब्रुवारीपासून इथून प्रवेश दिला जाणार आहे. आयुका गेटमधून मोठ्या प्रमाणात वाहने विद्यापीठात येऊन ती मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत होती. त्यामुळे विद्यापीठ कॅम्पसमधील वाहतुकीमध्ये मोठी वाढ झाली होती.या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून आयुका गेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र या निर्णयाचा फटका विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना बसला. त्यांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. यापार्श्वभूमीवर बायोमेट्रिक पद्धतीने वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत बायोमेट्रिक नोंदणी केली जाणार आहे.तरी आयुका शेजारील विद्यापीठ सुरक्षा चौकीमध्ये जाऊन याबाबतची नोंदणी करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी आयुका गेट होणार खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 1:20 AM