पुणे : अयोध्येतील राममंदिर आणि मशिदीच्या वादाला मानवतेची दिशा देण्यासाठी तर्कशास्त्र आणि कायद्याच्या पलीकडे गेले पाहिजे. त्या दृष्टीने दिशा देण्यासाठी रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जागेवर ‘विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन’ उभारावे, असा सूर विविध धर्मांतील दिग्गज आणि तज्ज्ञांच्या परिसंवादात सोमवारी उमटला.विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटीतर्फे हा परिसंवाद झाला. यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, संत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, पत्रकार अरुण खोरे, अनीस चिश्ती, अभय माटे, मिलिंद एकबोटे सहभागी झाले होते. या भवनासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह विविध धर्मांतील पंडित, तज्ज्ञ अभ्यासकांना पत्रे पाठविली. त्यातून सकारात्मक दिशा मिळालीे. जगातील सर्व धर्मग्रंथ जीवनग्रंथ असून, हे चिंतन नवीन पिढीसमोर नेण्याची गरज आहे,’’ अशी भावना कराड यांनी व्यक्त केली. धर्माधिकारी म्हणाले, ‘‘तत्कालीन काळात विविध धर्मांची केलेली मांडणी म्हणजे सिंथेसिस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारताची राज्यघटना हीदेखील सिंथेसिस असून, आता त्या नवीन सिंथेसिस संस्कृतीकडे जाण्याची वेळ आली आहे.’’
अयोध्येत विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन व्हावे
By admin | Published: April 26, 2016 1:28 AM