शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदची मदत : आयुष मंत्रालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 5:41 PM

आयुर्वेद हा भारतीय वैद्यकशास्त्राचा मानला जातो पाया

ठळक मुद्देसंसर्गजन्य आजारांशी असे लढा उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या असल्याचे यात अधोरेखित

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोरोनाबाधितांचे प्रमाणही वाढत आहे. या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांकडून दिला जात आहे. आयुष्य मंत्रालयानेही कोव्हिडच्या विळख्यापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदातील काही उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या असल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे.आयुर्वेद हा भारतीय वैद्यकशास्त्राचा पाया मानला जातो. यामध्ये दिनचर्या आणि ऋतूचर्येला महत्व देण्यात आले आहे. याच आयुर्वेदाचा आधार घेऊन संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. दररोजच्या वेळापत्रकात काहीसा बदल आणि आरोग्याबाबतची जनजागृती आपल्याला निरोगी राहण्यास मदत करेल, असा विश्वास आयुर्वेदतज्ञांनी व्यक्त केला आहे.

शरीराची नैसर्गिक संरक्षणप्रणाली टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर गरम पाणी प्यावे, दररोज किमान अर्धा तास योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेवर भर द्यावा, दररोजच्या स्वयंपाकात हळद, जिरे आणि लसणाचा वापर करावा, असे उपाय आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहेत.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

- सकाळी उठल्यावर दोन चमचे च्यवनप्राश घ्यावे- गवती चहा प्यावा किंवा तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, गूळ यांचा काढा करून सकाळी प्यावा.- दिवसातून एकदा किंवा दोनदा दूध-हळद यांचे सेवन करावे.

कोरोनापासून बचावासाठी स्वत:ची काळजी कशी घ्यावी?- सकाळी आणि संध्याकाळी नाकात दोन थेंब तिळाचे, खोबरेल तेल किंवा तूप घालावे- घशात खवखवत असल्यास पुदिना पाने किंवा ओवा उकळत्या पाण्यात घालून त्याची वाफ घ्यावी- लवंग पूड आणि मधाचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कफाचा त्रास कमी होतो.- खोकला, घशातील खवखव अशा परिस्थितीत डॉकटरांशी संपर्क साधावा.-------संसर्गजन्य व्याधीचा प्रादुर्भाव होत असताना रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी  गुळवेल, आवळा, पिंपळी, हिरडा, हळद या वनस्पतींचा आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर करावा. दोन चमचे धने, एक चमचा जिरे, दोन मिरे घेऊन दोन कप पाण्यात उकळावे. आटवून एक कप पाणी गाळून घ्यावे. या काढ्यात थोडी खडीसाखर घालावी. दोन पारिजातकाची पाने आणि चार तुळशीची पाने दोन कप पाण्यात घालून उकळावी. हा काढा रोज घ्यावा. जेवणामध्ये सैंधव मिठाचा वापर करावा. स्नानापूर्वी संपूर्ण शरीराला तिळाचे तेल, शेंगदाणा तेल किंवा खोबरेल तेल लावावे. नंतर गरम पाण्याने अंघोळ करावी. आपल्या वयानुसार, प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने प्रतिमर्ष नस्य करावे.- डॉ. लीना बावडेकर, आयुर्वेदतज्ञ 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर