वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथील आदर्श शिक्षण विकास मंडळद्वारा संचालित भीमाशंकर आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य अजनाळकर बोलत होते. या वेळी महाविद्यालयीन शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य अजनाळकर म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या द्वारा प्रायोजित वर्षभर भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या स्वरूपाचे कार्यक्रम भीमाशंकर आयुर्वेदिक महाविद्यालयात केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या हेल्थ फॉर ऑल या धोरणानुसार हमारा आयुष हमारा स्वास्थ्य या निर्धारानुसार विद्यार्थ्यांकरिता त्यांना आरोग्याप्रति माहिती मिळावी व आयुर्वेदाप्रति जागरूकता यावी त्या दृष्टीने ज्ञांनवर्धक अशी माहिती त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता वर्षभर कार्यक्रम आयोजित करून दिली जाणार आहे. सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला. शासन निर्देशानुसार विविध समितीचे प्रमुख व संयोजक यांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून वर्षभर अशा स्वरूपाचे कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. डॉ. सतीश चापडगावकर यांनी आभार मानले.
वडगाव काशिंबेग येथील भीमाशंकर आयुर्वेदिक महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमास सुरुवात झाली.