पुणे: बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या रिसर्च सोसायटीची ४७ वी दोन दिवसीय वार्षिक परिषद आभासी पद्धतीने शुक्रवारपासून सुरू होत आहे.
परिषदेसाठी आतापर्यंत १०७० डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १८२ शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. कोरोना-१९ नो टुडे, सेव्ह टुमारो हे परिषदेचे घोषवाक्य आहे. परिषदेचे उद्घाटन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके व यशदाचे संचालक चोक्कलिंगम यांच्या हस्ते २८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजता होईल.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते मार्गदर्शक आहेत. डॉ. वाय. के. आमडेकर, डॉ. निखिल जोशी, डॉ. अमर फेटाल, डॉ श्वेता येमुल-गोल्हार, डॉ. कॅथरिन ग्रिफीन, राजीव श्रीवास्तव, डॉ. स्वाती भावे, डॉ. महेश बाबू, डॉ. खुराणा, डॉ. हरीष शेट्टी, डॉ. विक्रम दत्ता, डॉ. योगेश शौचे, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ.एलिझाबेथ व्हीटेकर, डॉ. दिलीप कदम, डॉ. रॉबर्ट बोलिंजर, डॉ भूषण पटवर्धन यांची परिषदेत कोरोना १९ वर व्याख्याने होतील. संयोजन सचिव डॉ. आरती किणीकर यांनी ही माहिती दिली.
रिसर्च सोसायटी अध्यक्ष डॉ. विश्वनाथ येमूल, डॉ. प्रज्ञा भालेराव, डॉ पद्मसेन रणबागले, डॉ. सर्फराज पठाण, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. सविता कांबळे व डॉ. सुरेखा चव्हाण या वेळी उपस्थित होते.