तक्रारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनबिरोध करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बिनविरोध झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायतीत काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि सेनेचे दोन असे सात सदस्य बिनविरोध झाले होते. आज सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी गोपाळ लाखे यांच्या पीठासीन अध्यक्षतेखाली सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. सरपंच पदासाठी काँग्रेसच्या वतीने बाबासाहेब तुकाराम खेंगरे यांचा, तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड बाबासाहेब नामदेव पिलाणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सर्वांमुखी झालेल्या निर्णयानुसार या दोघांची एकमताने निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी लाखे यांनी केली. यावेळी ग्रामसेवक संजय भोसले, ग्रामपंचायत सदस्य पोपट दिगंबर खेंगरे, बेबीताई राजेंद्र खेंगरे, अलका चंद्रकांत गोसावी सुजाता गोसावी, शीतल प्रवीण खेंगरे आदी उपस्थित होते.
फोटो मेल केला आहे १) बाबासाहेब खेंगरे
२) अड् बाबासाहेब पिलाणे