पिंपरी : नालंदा, तक्षशिला सारख्या जागतिक दर्जाची विश्वविद्यालय तळेगावमध्ये उभे करण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिले होते. या स्वप्नापोटीत त्यांनी तब्बल ८७ एकर जागेची खरेदी तळेगाव परिसरात केली होती. १९४७ साली बाबासाहेबांनी या जागेत बंगला देखील बांधला होता. मात्र, कायदेमंत्री पदाची जबाबदारी, त्यांचे आजारपण आणि धर्मांतराची चळवळ अशा एक ना अनेक जबाबदारांमुळे बाबासाहेबांच्य मनातील विश्वविद्यालचे स्वप्न अखेर पूर्ण झालेच नाही. मात्र, बाबासाहेबांच्या स्वप्नांची दिशा दाखवणारा बाबासाहेबांनी बांधलेला बंगला आजही त्या जागेत उभा आहे.
बाबासाहेबांच्या मावळ परिसरातील वास्तव्यावर अभ्यास करणारे लेखक प्रभाकर ओव्हाळ यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी मावळातील निसर्ग, लेण्यांचा परिसर, गड किल्ले हे बाबासाहेबांना नेहमीच आकर्षीत करत होते. या भुमित मोठी शिक्षणसंस्था उभारण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठीच त्यांनी येथे तब्बल ८७ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, अन्य जबाबदाऱ्या आणि आजारापणामुळे बाबासाहेबांना हा संकल्प पूर्ण करता आला नाही.
जागेचा उपयोग फक्त शिक्षण संकुलासाठी
प्रभाकर ओव्हाळ यांनी सांगितले की, बाबासाहेबांबरोबर माईसाहेब या देखील तळेगाव भेटीत कित्येकदा येत होत्या. एकादा माईसाहेब यांनी येथील जागेतील थोडी जागा त्यांच्या भावास म्हणजे बाळ कबीर यांनी द्यावी तो त्या जागी दूध डेअरीचा व्यवसाय करु इच्छितो, असे सांगितले. त्यावर बाबासाहेबांनी या जागेत आपण शैक्षणिक संकुल उभे करणार आहोत, आणि या संकुलाची जबबदारी भविष्यात आपण संभाळावी . त्यातील शिक्षण पद्धती, घटना मी तयार करून देतो.
शिक्षण संस्थांना धनिकांची नावे नकोत
तळेगावामध्ये बाबासाहेबांना जे शैक्षणिक संकुल उभारायचे होते त्यासाठी आर्थिक चणचण देखील भासत होती. मात्र, शैक्षणिक शैक्षणिक संकुलांना धनिक व्यक्तीचे नावे देऊन निधी उभारण्यास बाबासाहेबांचा विरोधच होता.