दुरावस्थाझाले आहे. नुकताच पावसाळा हंगाम चालू झाल्यामुळे रस्त्यावरील
खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्डे तुडुंब भरल्याने प्रवाशांना ये-जा
करण्यासाठी त्यापासून त्रास सहन करावा लागत आहे. टणु ते नरसिंहपूर पर्यंत
रस्त्याच्या बाजूस पडलेल्या खडीच्या ढगांमुळे व वायरलेस केबल या पासुन
प्रवाशांना रस्त्यावर दोन चाकी व चार चाकी गाडी चालवीताना कसरत करावी
लागते आहे. राज्य मार्गाने अनेक वाहतूक करणार्या प्रवाशांना यापासून
धोकाही होऊ शकतो. ठेकेदाराचा मनमानी कारभार चालू असल्यामुळे कामे रेंगाळत
चालू आहे. तीर्थक्षेत्र लक्ष्मी नरसिंह देवस्थान निरा नरसिंहपूर या
देवस्थानासाठी 260 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा कामे धीरे-धीरे चालू
आहेत. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे व साचलेल्या पाण्याच्या
खड्ड्यांमुळे वाहतुकीस व दळण वळणासाठी प्रवाशांंन पुढे संकट निर्माण
झाले. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी याकडे लक्ष देऊन देवस्थान
आराखड्यातील कामांची चौकशी करावी व पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपूर पर्यंत
अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून घ्यावे ही ग्रामस्थ व भाविक भक्तांची
मागणी आहे
निरा नरसिंहपूर येथील राज्यमार्गावर पावसाचे साचलेले पाणी व
वाहतुकीसाठी कारावी लागत असलेली ग्रामस्थांना कसरत.