रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. हा रस्ता दीड वर्षापूर्वीचा या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजुंच्या साईट पट्ट्या संबधित ठेकेदाराने व्यवस्थित भरल्या नाहीत. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी येऊन काही ठिकाणी साईट वाहून गेल्या असून काही ठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहे. समोरासमोरा वाहन आल्यास एका वाहनाला रस्त्याच्या खाली उतरावे लागत असून साईटपट्ट्या नसल्याने वाहन पलटी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाकाळ असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कमी झाली होती. सध्या या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. तसेच दुचाकीस्वारांची संख्या वाढली आहे. रात्री-अपरात्री नवीन येणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांना या रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात होत आहे. तसेच ठाकरवाडी येथे रस्त्याच्या वळणावरती रस्त्यालगत एक मोठा खड्डा आहे. हा खड्डा रस्त्यालगत असणाऱ्या झाडे व गवतामुळे वाहनचालकांना लक्षात येत नाही, त्यामुळे येथेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईटपट्ट्या मुरमाने भरून भक्कम कराव्यात, तसेच ठाकरवाडी येथे रस्त्यालगत पडलेला खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
फोटो ओळ: गुळाणी -वाफगाव या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या वाहून गेल्या आहेत.
ठाकरवाडी येथे रस्त्यालगत पडलेला जीवघेणा खड्डा.