पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे स्थायीच्या बैठकीत तणाव निर्माण झाला. चिडलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी सभात्याग करीत निषेध नोंदवला.महापालिकेची दर मंगळवारी स्थायी समितीची बैठक असते. या बैठकीला स्थायी समितीचे सर्व सदस्य, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित असतात. मंगळवारी सुरू असलेल्या बैठकीमध्ये विकास कामे, निविदा याबद्दल चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकाने 50 लाखांच्या कामांवरून अतिरिक्त आयुक्तांना लक्ष्य केले. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादातून चिडलेल्या नगरसेवकाने अतिरिक्त आयुक्तांना थेट शिवीगाळ केली. चिडलेल्या अतिरिक्त आयुक्तांनी सभात्याग केल्यावर अन्य अधिकारी वगार्ने घडलेल्या प्रकाराचा निषेध करीत सभात्याग केला. यानंतर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड बैठकीमध्ये पोचले. या नगरसेवकाकडे पिस्तुल हिते असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:38 PM
सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकाने 50 लाखांच्या कामांवरून अतिरिक्त आयुक्तांना लक्ष्य केले. स्थायी समितीच्या बैठकीत तणाव
ठळक मुद्दे. स्थायी समितीच्या बैठकीत तणाव FY पुणे पालिका अधिकाऱ्यांनी केला सभात्याग